महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने पिंपरी चिंचवड मनपा मधील व्यापाऱ्यांच्या एलबीटी आकारणीच्या संदर्भातील समस्यांचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड मनपा मधील व्यापाऱ्यांच्या एलबीटी आकारणीच्या संदर्भातील समस्यांचे पिंपरी चिंचवड सीए इन्स्टिट्यूट ची शाखा व महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड म न पा कडुन अनेक व्यापारी आणि उद्योजक यांना एल बी टी च्या संदर्भामध्ये आकारणी आदेश प्राप्त झाले असून सदर आकारणी करताना नियमबाह्य ,तसेच बेकायदेशीर पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने हे आदेश पारित करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड मध्येच विक्री आणि खरेदी असलेल्या विक्रीवर एलबीटी म्हणजे हा स्थानिक कर लागू होत नाही, ह्याचा तसेच इतर अनेक वजावटींचा विचार न करता हे आदेश पारित केले असल्यामुळे व्यापाऱ्यांना फार मोठ्या रकमेची मागणी करण्यात आलेली आहे .
तसेच महाराष्ट्र सरकारने हा कायदाच १ एप्रिल पासून रदृद करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणून हे अन्यायकारक आणि बेकायदेशीर आकारणी आदेश( Assessment Orders) रद्द करून योग्य त्या पद्धतीने कायदेशीर रितीने आकारणी करावी. यासाठी एक विस्तृत निवेदन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट च्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आणि महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थांच्या वतीने मनपाचे आयुक्त श्री शेखर सिंहजी यांना नुकतेच देण्यात आले.
हे निवेदन सीए इन्स्टिट्यूट चे माजी पश्चिम विभागीय मंडळ कोषाध्यक्ष सीए डॉ अशोक कुमार पगारिया, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सीए अनिल वखारिया तसेच ॲड नवनीत बोरा पिंपरी शाखेचे माजी अध्यक्ष सीए संतोष संचेती श्री अग्रवाल आणि इतर पदाधिकारी यांनी दिले. या संदर्भात माननीय आयुक्त यांनी एलबीटी कमिशनर यांना योग्य ते आदेश देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.













