ताज्या घडामोडीपिंपरी

मसाप पिंपरी चिंचवड तर्फे शिक्षकांचा सन्मान आणि कविसंमेलन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आयुष्याचे गणित होतांना नवनवीन उत्तरे शोधू या

   या संयमाने या सुखाचा आनंद परिघ वाढवू या
           या ओळी आहेत वाघोली येथील शिक्षक हनुमंत देशमुख यांच्या. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद पिपंरी चिंचवड आयोजित शिक्षक सन्मान आणि कविसंमेलनाचे.  यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक पगारिया, संत साई विद्यालयाचे संस्थापक शिवलिंग ढवळेश्वर, प्रतिभा महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र कांकरिया, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ ,ज्येष्ठ शिक्षक श्रीकृष्ण मुळे उपस्थित होते.
             पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील सहभागी झालेल्या शिक्षक कवींनी एकाहून एक रचना सादर करून कविसंमेलनात रंगत आणली.
          सदर कवि संमेलनात सुभाष चटणे, सुलभा सत्तुरवार विलास वानखडे, स्नेहल भोर डॉ. विदुला व्यवहारे,  अंजली नवंगुळ  सौ अनुपमा बाविस्कर,  योगिता कोठेकर, प्रतिमा काळे, नरहरी वाघ,  रमाकांत श्रीखंडे, सुनिता बोडस, अशोक होनराव,  बंडा जोशी, विनीता श्रीखंडे,  शांताराम सोनार , बाळकृष्ण अमृतकर,  रेहाना आत्तार , संदीप राशीनकर , श्रुती राशीनकर,  दिनेश भोसले, शिवाजी चव्हाण , हनुमंत देशमुख, प्राची देशपांडे, उर्मिला व्यवहारे आणि इतर अशे  एकूण  ४६ शिक्षक कवींनी विविध विषयावर कविता सादर केल्या.
            पगारिया, ढवळेश्वर, कांकरिया, मुळे यांनी आपल्या शिक्षकांचे मनोबल करणारे मनोगत व्यक्त करून सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. प्रा. अमोल पाटील, श्रीकांत जोशी, जयश्री श्रीखंडे, किरण जोशी, नागेश गवाड  यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
              राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले तर संजय जगताप यांनी सूत्र संचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button