Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडगाव येथील वस्ताद स्वर्गीय बाळसाहेब विठोबा गावडे जलतरण तलाव गेल्या पंधरा दिवसापासून बंद आहे.तो लवकर सुरु करावा अशी मागणी वूई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी क्रीडा सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांच्याकडे केली आहे..

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक लोकांचे त्यामुळे हाल होत आहेत आधीच पास काढलेले लोक अडकले तर नवीन लोकांना समजेना नक्की कुठे पास काढावा.करदात्यांच्या पैशातून हे सर्व व्यवस्थित होणे अपेक्षित आहे परंतु प्रशासनाकडून यात फक्त चाल ढकल व निष्काळजी पणा करताना दिसत आहे.या तलावात फक्त पोहणे एवढेच नसते तर व्यायाम व अनेकांना सराव महत्वाचा आहे पण प्रशासन आजिबात गांभीर्याने घेताना दिसत नाही.या तलावातील फिल्टरिंग खराब झाल्याचे नावाने गेले पंधरा दिवस बंद ठेवणे म्हणजे नागरिकांची घोर फसवणूक आहे.आता सुट्ट्यामुळे शाळेतील कॉलेजातील मुले – मुली पोहण्यासाठी आतुर असताना या जलतरण तलावाची दुर्दश्या पाहून मोठा भ्रमनिराश होत आहे.

वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने व अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या पुढाकारने क्रीडा सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. विशेष म्हणजे विद्युत कडून दिरंगाई होते असे समजल्यावर आम्ही विद्युत विभागाकडे सुधा पाठपुरावा करीत आहोत हे काम क्रीडा विभागाचे असून सुधा आम्हीच करीत आहोत. पाटील साहेब यांनी त्वरित युद्ध पातळीवर निर्णय घेऊन तलाव त्वरित सुरु करावा अन्यथा वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन आगळे वेगळे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन दिले आहे.

आठ दिवसात हा जलतरण तलाव सुरु करण्याचा प्रयत्न राहील असे पंकज पाटील यांनी आम्हाला आश्वासन दिले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version