सारंगी करंजावणे यांची यशस्वी कामगिरी पुणे फेस्टिवल डर्ट ट्रॅक स्पर्धेत सारंगी करंजवणे अव्वल

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – 37 व्या पुणे फेस्टिवल डर्ट ट्रॅक स्पर्धेत आपापल्या गटात बाजी मारली, पुणे,बिबवेवाडी येथील गंगाधाम जवळील चोरडीया मैदानावर झालेल्या या चित्तथरारक स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून कोल्हापूर ,नाशिक ,सातारा अहिल्यानगर इथून एकूण 225 स्पर्धकांनी भाग घेतला होता, पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक श्री अभय छाजेड यांनी झेंडा फडकवून या स्पर्धेचा प्रारंभ केला. नितीन चोरडीया यांचे हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला, रोडीज एडव्हेंचर चे सर्वेसर्वा श्री अमरेंद्र साठे यांनी यांचे आयोजन केले,मोटर्स क्लब ऑफ इंडीया यांनी या स्पर्धेस मान्यता दिली.
यात सारंगी करंजावणे हिने आकाश सातपुते हे नॅशनल चॅम्पियन तसेच एक्स टि व्हि एस फॅक्टरी रायडर राहीलेत यांचे मार्गदर्शना खाली फक्त 13 दिवसांचे अथक सरावाच्या जोरावर स्पर्धेत भाग घेतला या स्पर्धेत इतर स्पर्धक जे सारंगी पेक्षा 3 ते 4 वर्षांचा अनुभवाने व वयाने ही मोठ्या असलेल्या स्पर्धकांवर बाजी मारली, सारंगीची ही पहीलीच स्पर्धा होती, अतीशय कमी वयात इतकी थरारक कामगीरी ने प्रेक्षकांची मने तिने जिंकली यात द्वितीय क्रमांक पटकावून ट्राॅफी मिळवूण पुणे व पिंपरी चिंचवडची मान देशात उंचावलीआहे. ती खूप धाडसी मुलगी असून विविध प्रकारच्या गाड्या ती चालवते ,तीचे वडील सचिन करंजावणे हे पण एक रायडर आहेत आणि इतर देशातही ते रायडिंग करून आलेले आहेत ,सामाजिक कामात त्यांचा मोठा मोलाचा वाटा असतो ,ते अनेक वर्षापासून पिंपळे गुरव येथे राहत आहेत, आई संजना करंजवणे ही उच्च शिक्षित असून त्या मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षा आहेत आजी,आजोबाचे तिला मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे ,घरातूनच क्रीडाविषयक कार्याला तिला प्रोत्साहन मिळते , आण्णा जोगदंड यांचे सहकार्य मोलाचे ठरले, तसेच मुलींचे सशक्तिकरणासाठी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने प्रयत्न करू हे आश्वासन दिले.














