Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»प्रशासकीय कामांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर नागरी सेवा सुलभीकरणाला गती देणारा – संकेत भोंडवे
ताज्या घडामोडी

प्रशासकीय कामांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर नागरी सेवा सुलभीकरणाला गती देणारा – संकेत भोंडवे

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com27 May 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  माहिती व तंत्रज्ञानाचा वापर प्रशासकीय कामकाजात वेगाने केला जात असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हा वेग साध्य केला आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने प्रशासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या नागरी सेवांचे पारदर्शकता वाढीस लागून त्यांचे सुलभीकरण नक्कीच गतीने होईल, असे मत केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव संकेत भोंडवे यांनी मांडले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे भोंडवे यांनी कौतुक देखील केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सोमवारी (२६ मे) संकेत भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात मध्यप्रदेश राज्यातील इंदूर महानगरपालिकेचे आयुक्त शिवम वर्मा, अतिरिक्त आयुक्त अभिलाष शर्मा, रेवा महानगरपालिका आयुक्त सौरभ सोनवणे, मध्यप्रदेश सरकारच्या नगर विकास आणि प्रशासन विभागाचे अपर आयुक्त डॉ.परिक्षित झाडे यांचा समावेश होता. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी आयुक्त तथा पुण्याचे माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड यांची विशेष उपस्थिती होती.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सुरुवातीला शिष्टमंडळाचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेत माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, नगर रचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उप अभियंता सुनिल पवार, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी आदी उपस्थित होते.

‘पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्रशासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा वापर उत्तम पद्धतीने केला जात असल्याचे येथे राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांवरून दिसून येत आहे. यामुळे महापालिकेचे कामकाज गतीने व लोकाभिमूख होत असून या प्रकल्पांमुळे महापालिकेच्या उत्पन्नात देखील वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. येथील बहुतांश प्रकल्प इतर महापालिकांमध्ये सहज राबवता येतील,’ असे भोंडवे म्हणाले. शहरी विकासाचा वेग साध्य करताना नागरी गरजांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. शिवाय भविष्यातील वाढणारा विस्तार आणि पायाभूत सुविधा निर्माण करताना येणाऱ्या अडचणींचा विचार देखील करणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहरात उत्तम प्रकारे हरित पट्टे विकसित केले आहेत. वृक्षपुनर्रोपणाचा यशस्वी प्रयोग महापालिकेने राबविला. अशा प्रकारच्या मॉडेलचे देशातील इतर शहरांनी देखील अनुकरण करायला हवे. पर्यावरणाचा प्राधान्याने विचार करून विकास प्रकल्प राबविणे गरजेचे असून जैवविविधता विभागासारखा स्वतंत्र विभाग प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असायला हवा, असेही भोंडवे म्हणाले. स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आधुनिक पद्धतीने विकसित होणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा उपयोग होऊ शकतो. देशात विविध ठिकाणी असा यशस्वी वापर सुरू आहे. त्यामुळे विविध प्रशासकीय यंत्रणानी केलेल्या अशा तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही भोंडवे यावेळी म्हणाले.

आयुक्तांनी दिली विविध प्रकल्पांची माहिती

आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी स्मार्ट सारथी, ई-ऑफिस प्रणाली, दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली, सॅप (SAP), भौगोलिक माहिती प्रणाली (GIS), जीआयएस लेअर, डिजिटल एलिव्हेशन मॉडेल, सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन (सीएचडीसी), हरीत सेतू मास्टर प्लॅन, पंतप्रधान गती शक्ती अभियान, तक्रार निराकरण प्रणाली, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, मिळकतकर प्रणाली, जीआय बेस रोड एसेट मॅनेजमेंट सिस्टिम, टीडी आर धोरण, शहरातील मालमत्तांचा केलेला ड्रोन सर्व्हे, एआय आधारित अनधिकृत होर्डिंगचा शोध, ई-रुपी प्रकल्प, दिव्यांग भवन, कौशल्यम प्रकल्प, नवी दिशा आदी प्रकल्पांची माहिती शिष्टमंडळाला दिली. हे प्रकल्प राबवल्यामुळे महानगरपालिकेला व शहरातील नागरिकांना कशा पद्धतीने फायदा झाला, याची आकडेवारीसह माहिती यावेळी त्यांनी दिली.

दिव्यांग भवनला भेट

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या दिव्यांग भवनला सहसचिव संकेत भोंडवे व त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाने भेट दिली. दिव्यांगांसाठी अडथळा विरहित व सुलभ करण्यात आलेली दिव्यांग भवनाची रचना, दिव्यांगांसाठी अत्याधुनिक उपकरणांसह उपलब्ध असणाऱ्या थेरपी, दिव्यांगांसाठी घेण्यात येत असलेले प्रेरणादायी आणि विकासात्मक कार्यक्रम, सुलभ व प्रगत डिजिटल लायब्ररी आदी माहिती यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी शिष्टमंडळाला दिली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleहुंडाबळी व महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कडक कायद्यांची मागणी – सुजाता नखाते यांचे अंबादास दानवे यांना निवेदन
Next Article पादचारी व सायकलस्वारांसाठी रस्ते अधिक सुरक्षित बनवण्यास दिले जात आहे प्राधान्य ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्पांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे काम सुरू
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.