ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संदीप काटेंचा सोसायटीधारकांशी थेट संवाद; भाजपच्या विकासदृष्टीला सकारात्मक प्रतिसाद

Spread the love

 

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते श्री. संदीप काटे यांनी शहरातील विविध सोसायट्यांमधील नागरिक व सोसायटीधारकांशी थेट भेटी घेऊन संवाद साधला. या प्रत्यक्ष संवादातून नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि स्थानिक विकासाबाबतच्या सूचना जाणून घेतल्या.

या भेटीदरम्यान भारतीय जनता पार्टीची विकासाभिमुख ध्येय-धोरणे, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध योजना तसेच महापालिका स्तरावरील नियोजित विकासकामांची सविस्तर माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा, उद्याने व नागरी सुविधा या मुद्द्यांवर विशेष चर्चा झाली.

सोसायटीधारकांनी या संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाजपच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला. नागरिकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि पाठिंबा पाहता येत्या निवडणुकीत भाजपला भक्कम जनसमर्थन लाभेल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. थेट जनसंवादातून निर्माण झालेल्या विश्वासाच्या वातावरणामुळे आगामी निवडणूक काळात भाजपचा प्रचार अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.

एकूणच, सोसायटी पातळीवरील हा संवाद उपक्रम भाजपच्या संघटनात्मक मजबुतीसह विकासाच्या मुद्द्यांना बळ देणारा ठरत असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button