ताज्या घडामोडीपिंपरी

रन टू फीड मॅरेथॉन उत्साहात संपन्न : मॅरेथॉन रनर्स द्वारे आरोग्य जागृती सोबतच , सामाजिक संदेश देखील..!

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रविवारी पहाटे पुणे शहरात एक आगळीवेगळी सामाजिक चळवळ अनुभवायला मिळाली, जेव्हा उन्नती सोशल फाऊंडेशन , इस्कॉन बीसीईसी, विशाल नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रन टू फीड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. इस्कॉनच्या फूड फॉर लाईफ उपक्रमाअंतर्गत ही मॅरेथॉन भुकेच्या समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचे सार एका वाक्यात व्यक्त होते – “एक मैल, एक जेवण.”

या मॅरेथॉनमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी, शाळांचे विद्यार्थी, वैयक्तिक धावपटू आणि स्वयंसेवक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. २१ किमी, १० किमी आणि ५ किमी अशा विविध अंतरांच्या स्पर्धात्मक धावसंख्या पुरुष आणि महिलांसाठी चार वेगवेगळ्या वयोगटांमध्ये घेतल्या गेल्या. तसेच लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फन रन चे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमातील सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे काही विजेत्यांनी त्यांची बक्षिसाची रक्कम रन2फीड या उपक्रमासाठी पुन्हा अर्पण केली—या कृतीतून या उपक्रमाचा खरा उद्देश दिसून आला.

या मॅरेथॉनची संकल्पना इस्कॉन बीसीईसी, पुणे यांनी रचली होती. धावण्याच्या माध्यमातून समाजसेवा आणि आध्यात्मिक मूल्यांचा संगम साधण्याचा हा प्रयत्न होता.

उद्घाटनप्रसंगी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई भिसे म्हणाल्या , “आपण येथे एकत्र आलो आहोत, केवळ धावण्यासाठी नव्हे, तर एक अत्यंत महत्त्वपूर्ण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी — भुकेशी लढण्यासाठी, आणि गरजूंपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी.ही मॅरेथॉन केवळ शरीराच्या क्षमतेची परीक्षा नाही, ती आपल्या मनाच्या संवेदनशीलतेची आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचीही ओळख आहे. आज पडणारे प्रत्येक पाऊल हे केवळ अंतर पार करणार नाहीत तर , ती भुलेलेल्या साठी उमेद, सहकार्य आणि माणुसकीचा मार्ग तयार करणार आहेत. या सारख्या सामाजिक उपक्रमांमुळेच आपला समाज अधिक संवेदनशील, अधिक मजबूत होतो. तसेच मी कॉर्पोरेट कंपन्यांना आणि जनसामान्यांना आवाहन करते की, अशा समाजोपयोगी कार्यांमध्ये सहभागी होऊन गरजूंना शुद्ध व पवित्र अन्न (प्रसाद) उपलब्ध करून द्यावे.”

याप्रसंगी , उन्नती सोशल फाऊंडेशन , प्राचेतास फाऊंडेशन , इस्कॉन – पुणे , अ‍ॅथलीट इनसाईड फिटनेस स्टुडिओ , ब्लु इन्फिनिटी डिजिटल मीडिया टेक्नॉलॉजीस् चेंबसर्व सदस्य , विविध वयोगटातील मॅरेथॉन रनर्स यांच्यासह पिंपळे सौदागर , राहटणी परिसरातील आरोग्यप्रेमी नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button