Spread the love
महिलांच्या विश्वासातून नेतृत्व मजबूत; पुनावळे-ताथवडे-वाकडमध्ये राहुल काटेंचा प्रभाव वाढतोय
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पुनावळे,ताथवडे, वाकड परिसरात भाजपाचे कार्यकर्ते राहुल काटे यांच्या पुढाकाराने ‘उत्सव आनंदाचा – खेळ पैठणीचा!’ या उपक्रमास महिलांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. महिला मतदारांशी थेट संवाद साधत, महिलांच्या कलेला व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम आगामी निवडणुका लक्षात घेऊन महत्त्वाचा ठरत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
कार्यक्रमाला परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसली. मंचावरून महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत कार्यक्रमाचे रूपांतर सामाजिक-जागृती व जनसंपर्क मोहिमेत करण्यात आले असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बाप्पू) काटे यांनी विजेत्या महिलांचा सन्मान केला. तर अभिनेत्री पल्लवी वैद्य यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमात ऊर्जा आणली. विजेत्या महिलांना टीव्ही, फ्रीज, मिक्सर, गॅस शेगडी अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रमात उत्साह आणि अपेक्षा निर्माण राहिली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार शंकर जगताप यांच्या मुख्य नेतृत्वाखालील संघटनात कार्यरत राहुल काटे यांची संघटनशैली, संपर्क आणि गाव ते सोसायटी स्तरावरची पोच यामुळे त्यांची राजकीय भूमिका अधिक मजबूत होत असल्याचे चित्र या उपक्रमातून दिसून येते.
महिला मतदार हे चिंचवडच्या निवडणुकीतील निर्णायक घटक असल्याने“महिला सशक्तीकरणातून मतदारसंघात विश्वास निर्माण करण्याची रणनीती”
भाजपकडून राबवली जात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
“महिलांचे सामर्थ्य ओळखून त्यांना संधी दिली तर समाज उज्वल भविष्याकडे जातो. हा उत्सव केवळ पैठणीचा नव्हे, तर महिलांच्या आत्मविश्वासाचा उत्सव आहे.”
– राहुल काटे
Share.
Leave A Reply

Exit mobile version