ताज्या घडामोडीपिंपरी
पीएमआरडीए मुख्यालयात संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामाजिक समता व मानवतेचा संदेश देणारे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या आकुर्डी येथील मुख्यालयात आज (दि. ८ डिसेंबर) उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, संचालक (विकास परवानगी) अविनाश पाटील, उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. श्रीमती रूपाली आवले-डंबे आणि अविनाश पाटील यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. समाजातील दुर्बल घटकांना आधार देत, समता, न्याय आणि सद्भावनेचा संदेश देणार्या संत जगनाडे महाराजांच्या कार्यावर यावेळी सहआयुक्त रूपाली आवले-डंबे यांनी भाष्य केले. तर, प्रताप पिंगळे यांनी जगनाडे महाराज यांच्या विचारांचा आणि कार्यांचा आढावा घेत, त्यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी पीएमआरडीएचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.




















