Spread the love

 

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना शहरात मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेशांची लाट उसळली आहे.

भाजपमधील काही माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली. यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे आणि अश्विनी जाधव यांचा समावेश आहे. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शहराध्यक्ष रूपाली आल्हाट आणि उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या पक्षप्रवेशांमुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, आणखी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत असून आगामी काळात आणखी पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version