Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी चिंचवड महापालिकेला केंद्र सरकारचा ‘शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार’
ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड महापालिकेला केंद्र सरकारचा ‘शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार’

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com10 November 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेने शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. या उपक्रमांसाठी महापालिकेला केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत “शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार” (Award of Excellence in Urban Transport) प्रदान करण्यात आला आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या अर्बन मोबिलिटी परिषदेत केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू, भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव श्रीनिवास कटिकिथला, विशेष कार्यकारी अधिकारी जयदीप यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनिल पवार तसेच आयटीडीपी इंडिया संस्थेचे प्रांजल कुलकर्णी आणि आशिक जैन यांनी हा सन्मान स्वीकारला. “सर्वाधिक नाविन्यपूर्ण वित्तीय यंत्रणा असलेले शहर” (City with the Most Innovative Financing Mechanism) या श्रेणीत हा पुरस्कार महापालिकेला प्राप्त झाला आहे.

शहराच्या वाहतुकीत हरित बदल घडविण्याचा उपक्रम

पिंपरी चिंचवड महापालिकेने देशातील पहिले ग्रीन बॉण्ड जारी करून गैरमोटारीकृत वाहतूक (Non-Motorised Transport – NMT) क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकले आहे.महापालिकेने ग्रीन बॉण्डद्वारे २०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला असून, या निधीतून हरित सेतू प्रकल्प आणि टेल्को रोड पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे नागरिकांना सुरक्षित व सावली असलेले पादचारी मार्ग, सुरक्षित सायकल मार्ग, सुरक्षित शाळा क्षेत्रे, सायकल पार्किंग, वृक्षलागवड, पावसाच्या पाण्याने परिसरात जमिनीतील पाणी पुनर्भरण आणि मार्गदर्शक फलकासह रस्ते फर्निचर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. हरित सेतू उपक्रमांतर्गत निगडी प्राधिकरण परिसरातील १७ किलोमीटर रस्त्यांवर विकासकामे सुरू करण्यात आली आहेत.
हरित सेतू रस्ते विकसित झाल्यानंतर केलेल्या सर्वेक्षणानुसार बहुतांश नागरिकांनी हे रस्ते मुलांसाठी आणि महिलांसाठी अधिक सुरक्षित असल्याचे सांगितले, तर अनेक लोक प्रतिनिधीनी/नागरिकांनी अशा रस्त्यांची संकल्पना शहरभर राबवावी, असे मत व्यक्त केले आहे. या रस्त्यांवर सुरक्षितपणे चालणे, थांबणे आणि सायकल चालवणे आता अधिक आनंददायी व सोयीचे झाले आहे.
या उपक्रमांची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून, महापालिकेला केंद्र सरकारच्या वतीने “शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे पिंपरी चिंचवड शहर देशभरात शाश्वत वाहतूक आणि नाविन्यपूर्ण आर्थिक नियोजनाचे आदर्श उदाहरण ठरले आहे. महापालिकेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चालणे, सायकल वापरणे आणि सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब वाढत आहे. शहरात हरित, आरोग्यदायी आणि सर्वसमावेशक वाहतूक संस्कृती निर्माण करण्यासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे शहरात शाश्वत वाहतूक व्यवस्थेची पायाभरणी झाली आहे. हरित सेतू व टेल्को रोडसारखे प्रकल्प हे केवळ पायाभूत सुविधा नसून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी,आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे नेणारे उपक्रम आहेत. केंद्र सरकारकडून मिळालेला ‘शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार’ हा पिंपरी चिंचवडच्या सर्व नागरिकांचा आहे आणि भविष्यातील शाश्वत विकासाच्या दिशेने आमच्या बांधिलकीला बळ देणारा आहे.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड महापालिकेने शाश्वत शहरी वाहतुकीसाठी वित्तीय स्वावलंबनाचा अभिनव मार्ग अवलंबला आहे. ग्रीन बॉण्डमुळे प्रकल्पांसाठी आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध झाला आणि विकासाच्या गतीत मोठी वाढ झाली. हा पुरस्कार म्हणजे आपल्या प्रयत्नांना मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील मान्यता आहे. हा सन्मान नागरिकांच्या सहभागानेच शक्य झाला.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

२०३६ पर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील जवळच्या अंतरावरील प्रवास पायी, व सायकलने आणि दुर अंतरावरील सार्वजनिक वाहतुकीने करणे शक्य होईल, हे उद्दिष्ट समोर ठेवून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या दिशेने हरित सेतू आणि टेल्को रोड प्रकल्प हे महत्त्वाचे टप्पे आहेत. आगामी काळात संपूर्ण शहर ‘१५ मिनिटांचे शहर’ या संकल्पनेनुसार विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
– बापू गायकवाड, सहशहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“डिव्हायडर तात्काळ हटवा; अन्यथा आमदार-खासदारांच्या घरावर मोर्चा” — डॉ. बाबा कांबळे
Next Article पिंपरी चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसनिमित्त रक्तदान!
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.