Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी चिंचवड शहरातील विविध घटकातील २०,००० नागरिकांचे महिला बचत गटांमार्फत होणार सर्वेक्षण
ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड शहरातील विविध घटकातील २०,००० नागरिकांचे महिला बचत गटांमार्फत होणार सर्वेक्षण

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com30 April 2025Updated:30 April 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी,, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला २०३२ साली ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. यासाठी महापालिकेच्या वतीने शहराच्या भविष्यातील सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी “पीसीएमसी@५०” शहर नियोजन धोरण राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरातील विविध घटकातील २०,००० नागरिकांचा सर्वेक्षण उपक्रम राबविणार आहे. या सर्वेक्षणामध्ये शहरातील विविध स्वयं सहायता गटातील (SHG) २५० हून अधिक महिला सर्वेक्षण करणार आहेत. या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी महिला बचत गटांच्या महिलांना सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

पीसीएमसी@५०” शहर नियोजन उपक्रमाअंतर्गत शहरातील सर्व स्तरातील नागरिकांचे प्रातिनिधिक स्वरुपात प्रतिनिधित्व सुनिश्चित करत सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणामध्ये महिला बचत गटांमार्फत शहरातील फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, रिक्षाचालक, नोकरदार वर्ग, झोपडपट्ट्यांतील कुटुंबे, गृहसंकुलातील रहिवासी, सामाजिक संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि शैक्षणिक संस्थाचे देखील सर्वेक्षण केले जाणार आहे. मे २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणारे हे सर्वेक्षण तीन आठवड्यांत पूर्ण होणार आहे.

येत्या काही दिवसांमध्ये महापालिका हद्दीतील विविध प्रभागांमध्ये हा सर्वेक्षण उपक्रम सुरू होणार आहे. यासाठी जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान सुमारे १,५०० हितधारकांच्या सहभागासह, फोकस गट चर्चा (FGDs) यशस्वीपणे पार पडल्या आहेत. त्यातून महत्त्वपूर्ण सूचनांची नोंद या उपक्रमांमध्ये घेण्यात आली आहे. “पीसीएमसी@५०” या शहर नियोजन उपक्रमाअंतर्गत शहरी वाहतूक, पर्यावरण, तंत्रज्ञान, प्रशासन, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यासाठी आयोजित फोकस गट चर्चा आणि नागरिक सर्वेक्षणातून मिळणारी माहितीच्या आधारावर महापालिकेच्या भावी योजनांचा पाया ठरणार आहे.

*चौकट – पीसीएमसी@५०” सर्वेक्षणासाठी महिला बचत गटांना महानगरपालिकेमार्फत प्रशिक्षण*
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला २०३२ सालापर्यंत ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरात “पीसीएमसी@५०” शहर नियोजन धोरण राबविण्यात येत आहे. यासाठी सोमवार (२८ एप्रिल) रोजी पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे टाटा स्ट्राईव्ह व महापालिकेच्या सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण करणाऱ्या बचत गटांच्या महिलांना सर्वेक्षकांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

हा सर्वेक्षण उपक्रम शहराच्या विकासाचे दीर्घकालीन दिशादर्शन ठरविण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. या सर्वेक्षणामध्ये शहरातील विविध स्वयंसहायता गटांतील (SHG) २५० हून अधिक महिलांचा सहभाग राहणार असून, त्यामुळे स्थानिक महिलांना सक्षम बनवण्यासोबतच सहभागी शहरी नियोजनालाही चालना मिळणार आहे.

या प्रशिक्षण सत्रास माहिती व जनसंपर्क विभागाचे उप आयुक्त अण्णा बोदडे व समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांच्यासह सर्वेक्षण करणाऱ्या बचत गटांच्या महिला देखील उपस्थित होत्या.

शाश्वत आणि समृद्ध पिंपरी-चिंचवड घडवण्यासाठी शहरातील नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. यासाठी “पीसीएमसी@५०” उपक्रमांतर्गत महिला बचत गटांमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणवेळी नागरिकांना माहिती देऊन महिला सर्वेक्षकांना सहकार्य करावे. नागरिकांनो तुमच्या अपेक्षा व सूचना मनमोकळेपणाने मांडा, जेणेकरून भविष्यातील सक्षम पिंपरी चिंचवड शहररचना आपल्या सामूहिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब ठरेल.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक , पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड शहराचे भविष्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने “पीसीएमसी@५०” उपक्रमांतर्गत शहराच्या विविध घटकामधील नागरिकांचे प्रातिनिधिक स्वरुपात सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी शहरातील बचत गटांच्या २५० महिलांना सर्वेक्षणांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भविष्यातील शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी सर्वेक्षणावेळी महिलांना नागरिकांनी सहकार्य करावे.
– विठ्ठल जोशी, उप आयुक्त , सामान्य प्रशासन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका .

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये लोकसेवा हक्क दिनानिमित्त विशेष बैठका व मेळावे
Next Article तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत शहर विकासकामांचा आढावा: तत्काळ अंमलबजावणीचे निर्देश
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.