ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून नोव्हेंबर अखेर एकूण २५ जण सेवानिवृत्त

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे उत्तमरित्या सेवा करून सेवानिवृत्त होणारे आपल्या सहकारी अधिकारी,कर्मचारी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आपल्या कार्याचा प्रत्यय दिला आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले आणि सेवानिवृत्त होणा-या अधिकारी,कर्मचा-यांना पुढील वाटचालीसाठी आरोग्यदायी शुभेच्छाही दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकर पवळे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात माहे नोव्हेंबर २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १७ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ८ अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होते.

या कार्यक्रमास सह आयुक्त मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता अभिमान भोसले, प्रेरणा सिनकर, जाहिरा मोमीन,संध्या वाघ,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

नोव्हेंबर २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये स्थापत्य सह शहर अभियंता अनघा पाठक, सहाय्यक आरोग्याधिकारी कुंडलिक दरवडे, मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षण मुसर्रत अन्सारी, कार्यालय अधिक्षक मीनाक्षी पवार, कनिष्ट अभियंता गुरुबसवेश्वर स्वामी जंगम, उपशिक्षक वंदना जाधव, मालन गायकवाड, प्लंबर वासुदेव आल्हाट, वॉर्ड बॉय दिगंबर वायकर, रखवालदार सहदेव तांडेल, मजूर विजय लांडगे, भाऊसाहेब सांडभोर, अनंत येलवंडे, विलास लांडे, सफाई कामगार शकील शेख, शांताराम खेंगरे, सफाई सेवक माया चव्हाण यांचा समावेश आहे.

तर, स्वेछानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये स्प्रे कुली पांडुरंग आधारी, सफाई कामगार शोभा नाईकनवरे, अंकुश झांझरे, कौशल्या घरत, शंकर शेंडे, लता गोठे, कचरा कुली गोविंद घुटे यांचा समावेश आहे.

कार्यकारी अभियंता अनघा पाठक यांना सेवानिवृत्ती दिवशीच सह शहर अभियंता या पदावर पदोन्नती मिळाली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button