Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांना मिळणार ४ टक्के सवलत
ताज्या घडामोडी

ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांना मिळणार ४ टक्के सवलत

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com13 July 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ याकाळात ऑनलाइन भरल्यास मालमत्ताधारकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत मिळणार आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तात्काळ तो भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ चा मालमत्ता कर ३० जून २०२५ पूर्वी ऑनलाइन कर भरणाऱ्यांना १० टक्के सवलत महापालिकेच्या वतीने देण्यात आली होती. या सवलतीचा लाभ तब्बल ३ लाख ३७ हजार मालतमत्ताधारकांनी घेतला आहे. ज्या मालमत्ताधारकांना या सवलतीचा लाभ घेता आला नाही,त्यांनी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मालमत्ता कर ऑनलाइन भरल्यास आता ४ टक्के सवलतीचा लाभ घेता येईल.

ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांची संख्या वाढतेय

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतीमुळे ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या सहा वर्षातील पहिल्या तिमाहित ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्येवरून ते स्पष्ट होत आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहित ऑनलाइन कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांची संख्या ८८ हजार ९०, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १ लाख ११ हजार १, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १ लाख २८ हजार १५ , आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २ लाख ९ हजार ६२५, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २ लाख ६० हजार ७५७ तर आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहित ऑनलाइन कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांची संख्या ३ लाख ३७ हजार एवढी आहे.

थकबाकीदारांवर कारवाई करण्यास सुरुवात

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत १८ विभागीय कार्यालयांमार्फत आतापर्यंत ३४ हजार ७६९ मालमत्ताधारकांना जप्तीपूर्वी नोटीस बजावण्यात आली आहे. ज्या थकबाकीदारांना नोटीस देऊनही पहिल्या तिमाहीत कर भरण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली आहे,  अशा मालमत्तांवर कारवाई करण्यास कर संकलन विभागाने सुरुवात केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. ऑनलाईन कर भरणाऱ्यांची वाढती संख्या ही नागरिकांचा महापालिकेवरचा विश्वास दर्शवते. तथापी ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तात्काळ ऑनलाइन कर भरून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा.

– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

महापालिकेच्या वतीने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्ता कर भरण्यावर सवलतींची योजना राबवली जात आहे. नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा महापालिकेच्या विश्वासार्हतेचा आणि पारदर्शक कामकाजाचा पुरावा आहे. वेळेत कर भरणाऱ्यांसाठी ही सवलत एक सन्मानच आहे. तथापी थकबाकीदारांवर विलंब दंड आकारणी व जप्ती कारवाई करण्यात येते त्यामुळे थकबाकीदारांनी लवकरात लवकर ऑनलाइन कर भरुन कारवाई टाळावी.

 – अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleएस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या सक्षम जाधव चे तलवारबाजी स्पर्धेत उल्लेखनीय यश
Next Article “रस्ता अडवला तर थेट गुन्हा दाखल करा” – उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रशासनाला इशारा
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.