नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी प्रभाग क्र.३१ मध्ये आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप व अरुण पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवार, (दि.२१) रोजी सकाळी १० वाजता करण्यात येत आहे. नवी सांगवी परिसरात प्रचारासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही प्रचार रॅली रविवार, दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार असून सुरुवात सुरची हॉटेल, एम. एस. काटे चौक, नवी सांगवी येथून होईल. या रॅलीचा मार्ग एम. एस. काटे चौक – इंद्रप्रस्थ कॉर्नर – साई चौक – फेमस चौक – युनियन बँक कॉर्नर – स्वामी विवेकानंद कॉर्नर – औंध हॉस्पिटल कॉर्नर – समतानगर असा निश्चित करण्यात आला आहे.
“संघर्ष, सन्मान आणि जनतेच्या कामासाठी” या विचारधारेतून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा अचूक मेळ साधत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत यावी, असे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाचा वृक्षमित्र, ‘वनश्री छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार’ तसेच ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार मोहीम अधिक जोमात राबवली जाणार आहे.
या प्रचार रॅलीत सर्व नागरिक, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
