ताज्या घडामोडीपिंपरी

JEE (Mains) परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते सत्कार

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  JEE (Mains) परीक्षेत चांगले गुण मिळवत यश संपादन करणाऱ्या कु.सुबोध भगवान भोसले व कु.वेदांत भगवान भोसले या दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जीवनावरील माहिती पुस्तिका देऊन भाजपा शहराध्यक्ष  शत्रुघ्न  काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कु.सुबोध भगवान भोसले यांनी JEE (Mains) या परीक्षेत 99.64% (AIR 5580) मिळवून IIT बेंगलोर या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला तसेच कु.वेदांत भगवान भोसले यांनी JEE (Mains) या परिषद 99.68%(AIR 4959) व JEE (Advanced) परीक्षेत (AIR 5347) मिळवून IIT हैद्राबाद या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला

 

या विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास, सातत्य व आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे श्री.शत्रुघ्न काटे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या व राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी उपस्थित पालक व स्थानिक नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button