Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अहिल्यादेवी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त  व तीनशे झाडे लावण्याचा संकल्प हाती घेतला तसेच नक्षत्रांची झाडे लावण्याचा एक उपक्रम ट्रान्सपोर्ट नगरी येथील सूर्यमुखी मंदिराच्या उद्यानामध्ये केला.

कार्यक्रमाचा नियोजन मंडलाध्यक्ष जयदीप खापरे तसेच हनुमान मंदिराचे ट्रस्ट व सर्व पदाधिकारी प्राधिकरणातील जेष्ठ नागरिक यांनी केले.

वृक्षारोपण विधान परिषद आमदार अमित गोरखे, विधानपरिषद आमदार उमा खापरे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुळीक तसेच हास्य क्लब प्राधिकरणाचे अध्यक्ष जगन्नाथ वैद्य यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच माजी उपमहापौर
शैलेजा मोरे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसेविका शर्मिला राजू बाबर, माजी
नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक माऊली थोरात, सरचिटणीस संजय मंगोडेकर, देविदास पाटील, गणेश ढाकणे, विजय सिनकर, राधिका बोर्लीकर तसेच वीप्र फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल गौन्ड, हनुमान प्रतिष्ठान निगडीचे अध्यक्ष प्रमोद
भावसार,असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुनाचे अध्यक्ष, निगडी खंडोबा ट्रस्टचे अध्यक्ष
तानाजी काळभोर, सोमनाथ काळभोर, सुशांत मोहिते भाजपाचे सर्व पदाधिकारी यांच्या
उपस्थितित कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाचे आभार मंडलाध्यक्ष जयदीप खापरे यांनी केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version