Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»शहरात पुढील ४८ तास उष्णतेची लाट येण्याची शक्यता; आयुक्त शेखर सिंह यांचे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
ताज्या घडामोडी

शहरात पुढील ४८ तास उष्णतेची लाट येण्याची शक्यता; आयुक्त शेखर सिंह यांचे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com26 April 2025Updated:26 April 2025No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सध्या सर्वत्र तीव्र उष्णतेचा पारा चढला आहे. देशभरात पुढील ४८ तास उष्णतेची लाट, गरम आणि दमट हवामान कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराला देखील या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गरजेचे असेल तरच घराबाहेर पडावे. उन्हात बाहेर पडताना डोकं झाकून ठेवावं, पुरेसे पाणी प्यावं आणि थेट सूर्यप्रकाशापासून बचाव करावा असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार २६ एप्रिलनंतर महाराष्ट्रात उष्णतेची लाट ओसरण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत गरम हवामानाचा सामना करावा लागणार आहे. म्हणून तीव्र उन्हाच्या लाटेपासून वाचण्यासाठी दुपारी १२ ते ४ दरम्यान घरच्या बाहेर पडू नका. थेट सूर्यप्रकाश टाळा महत्वाच्या कामासाठी बाहेर पडायचे असेल तर डोके ठेवा त्यामुळे नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

चौकट –
⦁ यांची घ्या अधिक काळजी :-
१) ६५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती
२) १ वर्षांखालील व १ ते ५ वयोगटातील मुले
३) गरोदर माता
४) मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती
५) अतिउष्ण वातावरणामध्ये काम करण्याऱ्या व्यक्ती
——–
उष्माघात होण्याची कारणे –

१ ) उन्हाळयामध्ये मजुरीची कामे फार वेळ करणे,
२) कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे.
३) जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे. (जसे बेकरी, भेळीच्या भट्टया, विटभट्टी)
४) घट्ट कपड्यांचा वापर करणे
अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
——-
⦁ लक्षणे –
१) थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
२) भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना येणे अथवा गोळे येणे
३) रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्यादी.

⦁ प्रतिबंधात्मक उपाय :-
अ) हे करा-
१) वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे.
२) कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत.
३) उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत. सैल, पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
४) जलसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावे (तहान लागली नसेल तरीही).
५) सरबत प्यावे, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
६) अधूनमधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी.
७) वर नमूद केलेली लक्षणे आढळल्यास ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व डॉक्टराच्या सल्ल्याने उपचार सुरु करावा
८) उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवल, फेटा, उपरणे, छत्री इ.चा वापर करावा.

९) घरे थंड ठेवण्यासाठी पंखे, कुलर यांचा वापर करण्यात यावा, तसेच वाळयाचे किंवा सुती ओले पडदे व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या / झरोके उघड्या ठेवण्यात याव्यात.
१०) कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. शक्य असल्यास माठ वापरावा,
११) कामाच्या ठिकाणी शक्य असल्यास सावली करून थेट सूर्यप्रकाशाचा संबंध टाळावा,
१२) गरोदर माता, मधुमेह व हृदयविकार असलेले कामगार यांची जास्त काळजी घेण्यात यावी.

ब) हे करु नका –
१) लहान मुले किवा पाळीव प्राण्याना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाह‌नात ठेऊ नये. तसेच
२) दारे, खिडक्या बंद करून ठेऊ नये.
३) दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीमध्ये उन्हात जाणे टाळावे.
४) गडद रंगाचे, घटट्ट, जाड कपडे, व कृत्रीम घालण्याचे टाळावे.
५) तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे दु. १२.०० ते ३.३० या कालावधीमध्ये टाळावीत
——-
⦁ असे घ्या उपचार
१) रुग्णास वातानुकुलीत खोलीत अथवा हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत,
२) रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
३) रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी.
४) रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टटया ठेवाव्यात, आईस पॅक लावावेत.
५) आश्यकते नुसार सलाईन द्यावे.

चौकट –
काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना –
शक्यतो दुपारच्या वेळेत (१२ ते ४) घराबाहेर जाणे टाळावे

भरपूर पाणी प्या व शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका

हलका व सूती कपडे परिधान करा.

गरम पदार्थांचे सेवन करू नका
गरज असल्यास छत्री, टोपी, गॉगलचा वापर करा.

सार्वजनिक ठिकाणी लागणाऱ्या सुविधा व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येत आहे

देशात सर्वत्र तीव्र उष्णतेची लाट पसरणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन आहे की,महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका. शक्य तेवढे ऊन उतरल्यानंतर ४ वाजेनंतर घराबाहेर पडा. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि आरोग्याच्या समस्या असलेल्यांनी अधिक काळजी घ्यावी. नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी करत प्रशासनाला सहकार्य करावे
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक , पिंपरी चिंचवड महानगरपालिका

येत्या ४८ तासांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. शहरातील शाळा, वर्कशॉप्स व सार्वजनिक कार्यक्रमांबाबतही काळजी घ्यावी. उष्णते संदर्भातील सर्व उपचार पालिका रुगणालयात उपलब्ध आहेत. या काळात काही लक्षणे आढळल्यास आपल्या जवळील महानगरपालिकेच्या रुग्णालयाला भेट देऊन उपचार घ्या.
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी , वैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleथकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची थेट कारवाई; लिलावाचीही शक्यता
Next Article परंदवडी येथे दलितवस्तीमध्ये समाजमंदिराचे बांधकाम पूर्ण
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.