Spread the love

 

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदु हृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रभाग क्रमांक १४ अंतर्गत दत्तवाडी, मोहननगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन व रामनगर परिसरात भव्य आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांत रक्तदान शिबिर, मोफत रक्त तपासणी, मोफत डोळे तपासणी, मोफत बॉडी फॅट चेकअप, मोफत कांस्य मशीन मसाज व ‘कार्य अहवाल प्रकाशन सोहळा’ यांचा समावेश होता. नागरिकांनी सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रक्तदान शिबिरात तब्बल २४९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी १८० नागरिकांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली. तसेच १६५ नागरिकांनी रक्त तपासणी, २९५ नागरिकांनी बॉडी फॅट तपासणी, तर ३०५ नागरिकांनी मोफत आयुर्वेदिक कांस्य थाळी मसाजचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना संघटक महाराष्ट्र वसंत मोरे व माजी आमदार, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीत शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील, माजी नगरसेविका उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, मारुतीराव भापकर, जिल्हा महिला संपर्कप्रमुख लतिकाताई पाष्टे, जिल्हा समन्वयक सुशीला पवार, शहर संघटिका रूपाली आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते विशाल यादव, दीपा महेश काटे, उपशहरप्रमुख अमोल निकम, सुदाम परब, विजय गुप्ता, अजय लड्डा, निलेश शिंदे, युवा नेते अजय काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन सोमनाथ दादा काळभोर, गोविंदराव शिंदे, ऋषिकेश घोरपडे, कृष्णा माने, किशोर शिंदे, ऋषिकेश कडव यांनी केले.
या सर्व उपक्रमांचे मुख्य आयोजन शिवसेना युवासेना पिंपरी-चिंचवडचे उपशहरप्रमुख निखिल दळवी यांनी केले होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version