Spread the love

 

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कोया फिटनेस फेडरेशन संस्थेचा दशकपूर्ती सोहळा रविवारी (दि.27) पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे साजरा करण्यात आला. कोया ही पिंपरी चिंचवड शहरातील पहिली व एकमेव सायंटिफिक रिदमिक जिम्नॅस्टिक्स खेळाचे प्रशिक्षण देणारी संस्था असून, तेथे केवळ मुलींना प्रशिक्षण देण्यात येते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे केंद्रप्रमुख डॉ. मनोज देवळेकर तसेच, सिम्बायोसिस स्कूल ऑफ स्पोर्ट्स सायन्सच्या संचालिका डॉ. नयना निमकर, पिंपरी-चिंचवड जिम्नॅस्टिक्स संघटनेचे संजय मंगोडेकर, चेतन भुजबळ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात गणेशवंदना ही योगासनाच्या प्रात्यक्षिकांनी झाली. संस्थेच्या 70 मुलींनी योगासन व रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या कौशल्यांचे सादरीकरण करून उपस्थित समुदायाचे लक्ष वेधले. आमदार अमित गोरखे यांनी संस्थेला येणार्‍या जागेच्या अडचणीसाठी सहकार्य करू. मुलींसाठी उत्कृष्ट दर्जाचा सुविधा उपलब्ध करू देण्याचे आश्वासन दिले. खेळाडू अभिश्री राजपूत हिच्या कामगिरीने भारावून जाऊन त्यांनी तिला नवीन युगाची हिरकणीची उपमा दिली. आमदार उमा खापरे यांनी इतक्या कमी वयात खेळासाठी अभिश्री हिनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करत, तिला शुभेच्छा दिल्या.

डॉ. नयना निमकर यांनी खेळाडूंच्या प्रगतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कामगिरी वाढवण्यासाठी मदतीचे हात पुढे केला. डॉ. मनोज देवळेकर यांनी 2036 च्या ऑलिंपिकमध्ये कोया फिटनेसचे खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास व्यक्त केला. क्रीडाकुलच्या पहिल्या तुकडीची विद्यार्थिनी क्रीडा क्षेत्रासाठी भरीव काम करते आहेत, हे क्रीडाकुलचे मोठे यश आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. फेडरेशनच्या संचालिका अभिश्री राजपूत यांनी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version