Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण करून देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे
ताज्या घडामोडी

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण करून देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com30 May 2025Updated:30 May 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर एक सांस्कृतिक शहर म्हणून उदयास येण्यासाठी ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’ सारखे सांस्कृतिक कार्यक्रम नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत. या शहराची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून झालेली सुरुवात भविष्यकाळात भव्य स्वरुप धारण करेल. या सांस्कृतिक चळवळीला पुढे नेण्यासाठी या क्षेत्रातील जाणकरांनी सहकार्य करावे. नागरिकांच्या सहभागामध्ये याचे यश अवलंबून आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी, रयत शिक्षण संस्थेचे पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय आणि मुंबा फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २९ मे ते ३१ मे याकाळात ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२५’ चे आयोजन आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर सभागृह आणि चिंचवड मधील छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा फुले स्पर्धा परीक्षा केंद्र येथे केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज, गुरुवारी आकुर्डी येथील ग.दि.माडगुळकर सभागृहात अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

 

पिंपरी चिंचवड महापालिका उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, हभप प्रकाश महाराज मोरे, उद्योजक विजयराव चौधरी, गोरख कातुरे, विजय बोत्रे, लेखक शरद तांदळे, रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, अभिषेक अवचार, दत्ता गुंड, जय भोसले, डॉ.विश्वास शेंबेकर, सायली शिंदे, रयत विद्यार्थी विचार मंचाचे अ‍ॅड. धम्मराज साळवे आदी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय चित्रपटाची महोत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर चित्रपट महोत्सव आयोजित करण्यामागील भूमिका विषद करण्यात आली.

 

यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराची ओळख उद्योगनगरी म्हणून आहे. शहर विकासात भौतिक, आर्थिक विकासासोबत कला, सांस्कृतिक, साहित्य आदी विविध क्षेत्रांतील विकास ही त्या शहराची ओळख निर्माण करण्यास महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच भविष्यात या शहराची ओळख उद्योगनगरीसोबतच क्रीडानगरी, विद्यानगरी, सांस्कृतिक नगरी व्हावी, यासाठी महापालिका सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रमांना साथ देत असते. महापालिका आयुक्त शेखर सिंह हे त्यासाठी आग्रही पुढाकार घेतात, असे खोराटे म्हणाले.

मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम

या चित्रपट महोत्सवाला देश-विदेशातून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांचीही उपस्थिती आहे. यासर्वांना मराठी भाषेतील चित्रपट जास्तीतजास्त बनवण्याचे आवाहन करतानाच अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात चित्रपटांचे महत्त्वाचे स्थान असते. चित्रपटामध्ये समाजाचे प्रतिबिंब असते. अनेक चित्रपटांमध्ये समाजाचे मूल्य, भावना आणि समज बदलण्याची ताकद देखील असते. मराठी भाषेमध्ये आणखी दर्जेदार चित्रपट कशा पद्धतीने तयार करता येतील, यावर देखील विचारमंथन अशा चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. या भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम असून या माध्यमाचा चांगला वापर करून घेणे महत्त्वाचे आहे.

उपायुक्त पंकज पाटील म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचा सांस्कृतिक विकास व्हावा, नागरिकांना वेगवेगळ्या कलाकृती पाहता याव्यात, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन पिंपरी चिंचवड शहरात केले आहे. या महोत्सवामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल ९० चित्रपट,  लघुपट, माहितीपट, अ‍ॅनिमेशन चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहेत. शहरातील जास्तीतजास्त नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणाले, मराठी चित्रपटांचे मूल्यमापन अशा महोत्सवाच्या माध्यमातून होईल. पिंपरी चिंचवड शहरातील कलाकारांना एकत्र आणण्याचे काम या महोत्सवाच्या निमित्ताने झाले आहे. कोणत्याही शहराचे मूल्यमापन हे केवळ तेथील भौतिक पायाभूत सुविधांवर नाही तर तेथील सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यावरून होत असते. त्यासाठी अशाप्रकारचे चित्रपट महोत्सव उपयुक्त ठरत असतात. शहरामध्ये कलाकारांना बळ देण्यासाठी महापालिकेसारखी संस्था पुढे येत आहे, ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवल्यामुळे विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रोत्साहन मिळेल, व ते नवनिर्मितीच्या अविष्कार करून शहराचा सांस्कृतिक वारसा पुढे नेतील. 

उद्योजक गोरख कातुरे, विजयराव चौधरी, विजय बोत्रे, प्राचार्य डॉ.पांडूरंग भोसले, शरद तांदळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून अभिषेक अवचार यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यामागील भूमिका मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.कामायनी सुर्वे व प्रा. विक्रांत शेळके यांनी केले तर महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी आभार मानले.

 

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“सावरकरांचे विचार आजही स्फूर्तीदायक” – डॉ. जितेंद्र होले
Next Article पीसीईटीच्या वतीने ‘दहावी नंतरची शाखा निवड’ या पुस्तकाचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.