दाभोलकरांनी वाहिली संतांच्या विवेकाची पताका- प्रभाकर पवार

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संतांच्या विवेकाची पताका वाहून डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वैद्न्यानिक दृष्टीकोन आणि विवेककारणाच्या सहाय्याने व्यापक समाज परिवर्तन करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला” असे उद्गार पैस रंगमंचचे उद्घाते, नाट्य लेखक, दिग्दर्शक व अभिनेते प्रभाकर पवार यांनी काढले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड शाखेच्या 32 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की आषाढी एकादशीस लाखो वारकरी पंढरपूर येथे जाऊन संतांच्या अभांगवाणीचा उदघोष करतात. या उद्घोशांमधून प्रतीत होणारा व अंधश्रद्धांवर केलेल्या प्रहाराचा योग्य अर्थ बुवाबाजीला दूर ठेवण्यासाठीतरी आपल्या जीवनात उतरवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे; अन हेच काम दाभोळकर करत होते.
या सोहळ्यात समितीचे विश्वस्त अरविंद पाखले, मिलिंद देशमुख, विजय सुर्वे, श्रीपाल ललवाणी, डॉ रोहित अकोलकर, राधा वाघमारे, इ. नी आपले मनोगत व्यक्त केले. समितीच्या ३२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सोनद सेवा प्रबोधिनीच्या सहकार्याने डॉ नरेंद्र दाभोळकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची ( एन.डी.आर.टी.आय. ) स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत चार महिन्याचा वैद्न्यानिक दृष्टीकोन प्रमाणपत्र आभ्यासक्रम सुरु करण्यात आला. हा अभ्यासक्रम दर रविवारी दोनतास या प्रमाणे १६ रविवार औन्लाइन प्रणालीद्वारे विनामूल्य शिकविला जाणार आहे. समितीचे संस्थापक सदस्य डॉ राजेंद्र कांकरिया यांनी या अभ्यासक्रमाची तोंडओळख करून दिली व या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ९४२२५१७५७० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले.
३२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भारत विठ्ठलदास, सीमा बावनकर यांना डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या नावे उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार तर विश्वास पेंडसे याना ग्रंथदिन्डीचे उत्कृष्ट प्रवर्तक म्हणून विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बीशार्प क्लासेसच्या संचालिका सिए क्षितिजा कांकरिया, गुलामअली भालदार, विद्ध्यार्थी यांचे सहकार्य लाभले. समारंभाचे सूत्र संचालन शुभांगी घनवट यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजू जाधव यांनी मानले.













