चऱ्होली बुद्रुक वाघेश्वर विद्यालयामध्ये माजी विदयार्थ्यांचा रौप्य महोत्सवी स्नेह मेळावा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाघेश्वर विद्यालय येथे 20 एप्रिलला इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला.या कार्यक्रम मध्ये प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मा. मानद सचिव के. के. निकम विद्यालयाचे प्राचार्य धावडे सर तसेच इतर सहकारी शिक्षक व 99 – 2000 बॅच चे 32 शिक्षक व त्याच बॅच चे 192 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी शाळेसाठी 80 लिटर पाणी गार करण्याची क्षमता असलेला वॉटर कूलर शाळेस भेट दिला.
सकाळी सात वाजता श्री वाघेश्वर मंदिर येथे अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी नऊ ते दहा या वेळेत शाळेमध्ये उपस्थित झाले, सर्वांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले.
तसेच सर्व शिक्षक दहा वाजेपर्यंत शाळेच्या प्रांगणात उपस्थित झाले,त्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर स्टेज वरती जाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळेचे विद्यमान प्राचार्य श्री धावडे यांनी अध्यक्ष पद भूषविले त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना जयमाला भोसले यांनी केली व त्यानंतर आठ ते नऊ विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून सहा ते सात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दुपारी एक ते दोन या कालावधीत भोजनाचा सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी आस्वाद घेतला. दोन ते पाच या कालावधीत सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पूर्वीप्रमाणे आपले वर्ग भरविले.
शिक्षकांनी त्यांचे क्लास घेतले व विद्यार्थ्यांनी त्या क्लासमध्ये आपली उपस्थिती दाखवली. विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यासाठी सेल्फी पॉईंट व सेल्फी बॉक्स याची व्यवस्था करण्यात आली होती इतर मनोरंजनाचा कार्यक्रमाची व्यवस्था देखील विद्यार्थ्यां साठी ठेवण्यात आली होती. त्यानंतर 5. वाजता वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन राहुल काटे,सतिश तळेकर,सारंग तापकीर,तानाजी तापकीर,हर्षद तापकीर योगेश ताजणे,महेश तापकीर,चेतन तापकीर,राहुल कोतवाल,राकेश तापकीर,अमोल तापकीर,सागर थोरवे,संतोष तापकीर,सुरज ताम्हाणे,सारिका काळजे,पुनम चतुर,रेखा तापकीर,नयना ताजणे,रत्नमाला तापकीर,सरिता जगताप,वंदना तापकीर या सर्व विद्यार्थ्यांनी केले.













