Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुक्त शेखर सिंह यांना १० लाखांचे प्रथम पारितोषिक प्रदान
ताज्या घडामोडी

‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुक्त शेखर सिंह यांना १० लाखांचे प्रथम पारितोषिक प्रदान

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com22 April 2025Updated:22 April 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस मालमत्ता कर संकलन वाढीसाठी राबविलेले नवोपक्रम, ऑनलाईन सुविधा, मालमत्ता जप्ती लिलाव, जिओ सिक्वेन्सिंग, यू. पी. आय. सी. आयडी आदी प्रस्तावांमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराअंतर्गत १० लाख रुपयांचे पारितोषिक महापालिकेस मिळाले असून आज मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या नागरी सेवा दिन २०२५ आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२३-२४ व २०२४-२५ पारितोषिक प्रदान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुक्त शेखर सिंह यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

यावेळी राज्याच्या कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यशदाचे अतिरिक्त महासंचालक राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागांचे, जिल्ह्यांचे, महापालिकांचे प्रशासकिय अधिकारी आणि कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

राज्यस्तरीय समितीने महानगरपालिकेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाची सखोल छाननी करून ही निवड केली. मालमत्ताकरवाढीसाठी महानगरपालिकेने राबवलेले उपक्रम, प्रशासनातील पारदर्शकता, तांत्रिक साधनांचा वापर, लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न आणि उत्तम कार्यप्रणाली हे सर्व पैलू यामध्ये महत्वाचे ठरले.

चौकट – प्रभावी उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे राज्यातील झपाट्याने वाढणारे शहर आहे. यामुळे दरवर्षी नव्या मालमत्तांची भर पडत असून, पायाभूत सुविधांचा पुरवठा करण्यासाठी मालमत्ताकर हे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. हे लक्षात घेऊन महापालिकेने करसंकलन वाढीसाठी खालीलप्रमाणे विविध उपक्रम राबवले:

१) ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ – नागरिकांनी आपल्या मालमत्तेची माहिती स्वतः भरून देण्यासाठीचा उपक्रम.

२) प्रत्येक मालमत्तेस युपीक-आयडी देणे – मालमत्तांची अचूक नोंद ठेवण्यासाठी युनिक ओळख क्रमांक.

३) जिओ सिक्वेंसिंग व ड्रोन सर्वेक्षण – मालमत्तेचे स्थान व आकृती यांचा अचूक नकाशा तयार करण्यासाठी.

४) भारत बिल पे सिस्टम व ऑनलाइन पेमेंट सुविधा – घरबसल्या कर भरणा शक्य करणारी प्रणाली.

५) मालमत्ता जप्ती व लिलाव प्रक्रिया – थकबाकीदारांविरोधात कठोर पावले उचलण्याची कारवाई.

६) प्रकल्प सिध्दी – महिला बचत गटांच्या सहभागातून बिलांचे शंभर टक्के वितरण.

७) डेटा आधारित निर्णय प्रक्रिया – करदात्यांच्या वर्तनावर आधारित नियोजन व जनजागृती मोहिमा.

चौकट – सवलतींचा प्रभावी वापर
महापालिकेने करदात्यांसाठी विविध सवलती जाहीर केल्या. यामध्ये पर्यावरणपूरक इमारतींना, ऑनलाइन पद्धतीने कर भरल्यास आणि महिलांच्या नावावर मालमत्ता असल्यास सवलती दिल्या गेल्या. त्यामुळे कर भरण्याचा वेग वाढवण्यास मदत झाली.

*चौकट – करसंकलनामध्ये विक्रमी वाढ*
महापालिकेच्या या सर्व उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, गेल्या तीन आर्थिक वर्षांत करसंकलनामध्ये मोठी वाढ झाली:

२०२१-२२ : ६२८ कोटी रुपये
२०२२-२३ : ८१६ कोटी रुपये
२०२३-२४ : ९७७ कोटी रुपये (यापैकी ५५४ कोटी रुपये ऑनलाइन भरणा)

विशेष म्हणजे २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीतच ४४९ कोटी रुपयांचे करसंकलन.

चौकट – प्रशासनाची गतिमानता आणि नवोपक्रमांना चालना
आयुक्त शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली करसंकलन विभागाने ही कामगिरी साकारली असून, यामध्ये विविध विभागांमधील समन्वय, योजना आखणी आणि अंमलबजावणीतील काटेकोरपणा दिसून आला. या पुरस्कारामुळे महापालिकेच्या प्रशासनातील गतिमानता, नवोपक्रमशीलता, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, महिला सहभाग आणि करदात्यांशी असलेला संवाद याला शासनाकडून मिळालेली मान्यता अधिक दृढ झाली आहे. हे यश केवळ आर्थिक दृष्टिकोनातून नाही तर लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे.

“कटिबद्ध जनहिताय” या महानगरपालिकेच्या ब्रीदवाक्यानुसार महानगरपालिका कामकाज करत आहे. करसंकलन विभागाने पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, महिला सहभाग आणि नागरिकांच्या सक्रिय सहकार्याच्या आधारावर मालमत्ता कर व्यवस्थापनात उल्लेखनीय बदल घडवून आणला आहे. ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ अंतर्गत मिळालेला हा पुरस्कार महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचे फलित असून, नागरिकांचा विश्वास आणि सहभाग हेच आमचे खरे बळ आहे. भविष्यातही लोकाभिमुख, गतिमान आणि उत्तरदायित्वपूर्ण प्रशासन देण्याची आमची कटिबद्धता अशीच कायम राहील.”
— शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेचा २३ एप्रिलपासून प्रारंभ
Next Article ‘एमआयटी एडीटी’त रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.