Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पर्यावरण व शाश्वत विकासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने टाकलेले पाऊल अभिमानास्पद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ताज्या घडामोडी

पर्यावरण व शाश्वत विकासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने टाकलेले पाऊल अभिमानास्पद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com11 June 2025No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शहरात पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकास प्रकल्प राबविण्यासाठी हरित कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. ही केवळ पिंपरी चिंचवड शहरासाठीच नव्हे तर राज्य सरकारसाठी देखील अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

पिंपरी चिंचवड महापालिकेने पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, हरित कर्ज रोख्यांच्या (ग्रीन बाँड्स) माध्यमातून २०० कोटी रुपयांचा निधी यशस्वीरित्या उभारला आहे. या ऐतिहासिक यशानंतर आज मुंबई शेअर बाजारात (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) हरित कर्ज रोख्यांच्या लिस्टिंग निमित्ताने बेल रिंगिंग समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या उद्घाटन प्रसंगी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, डॉ. के. गोविंदराज, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक सुंदररामन राममूर्ती, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक प्रवीण जैन, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सुनिल पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, ए. के. कॅपिटल प्रा. लि. च्या व्यवस्थापकीय संचालिका अदिती मित्तल यांच्यासह महापालिका व मुंबई शेअर बाजारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित कर्ज रोखे इश्यू करताच पहिल्या मिनिटातच १०० कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला. ही अभिमानास्पद गोष्ट असून यावरून महाराष्ट्र सरकार व पिंपरी चिंचवड महापालिका यावर गुंतवणूकदारांचा असणारा विश्वास दिसून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्थानिक स्वराज्य संस्थांनी म्युनिसिपल बाँडद्वारे जास्तीत जास्त निधी उभारावा, यासाठी सातत्याने आग्रही असतात. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने आघाडी घेतली आहे. बाँड लिस्टिंग करणे ही खूप क्लिष्ट गोष्ट आहे. यासाठी सहकार्य केलेल्या प्रत्येक संस्थेचे, व्यक्तीचे मी अभिनंदन करतो. तसेच हरित कर्जरोख्यांतून उभारला जाणारा निधी हा पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे शहरात हरित सेतूसह विविध पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे, ही देखील चांगली गोष्ट आहे. कर्जरोख्यांतून निधी उभारण्यात आघाडी घेतल्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेला २० कोटींचे अनुदान देखील प्राप्त होणार आहे, असेही ते म्हणाले.

आमदार शंकर जगताप म्हणाले, हरित कर्ज रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारण्याचे काम पिंपरी चिंचवड महापालिकेने केले आहे. याचा फायदा पिंपरी चिंचवड शहरात पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी होणार आहे. आगामी काळात अशाच पद्धतीने सामाजिक तसेच महापालिकेच्या इतर विकास कामांसाठी कर्ज रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारता येऊ शकतो का, यादृष्टिनेही प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून शहराचा विकास अधिक गतीमान होण्यास मदत होईल.

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या, पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित कर्ज रोख्यांद्वारे निधी उभारण्याचे जे पाऊल उचलले आहे, ते कौतुकास्पद आहे. महापालिकेने कर्जरोखे इश्यू करताच त्याला गुंतवणूकदारांनी जो प्रतिसाद दिला, तो पाहता शासकीय संस्थांवरील त्यांचा विश्वास स्पष्ट होतो. शहरीकरण झपाट्याने वाढत असताना पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकास साधणे गरजेचे आहे. त्यासाठी हरित कर्ज रोख्याच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेने निधी उभारण्याचे उत्तम उदाहरण इतरांसमोर ठेवले आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी या ऐतिहासिक टप्प्यावर आनंद व्यक्त करताना सांगितले, पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेली ही कामगिरी केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर पर्यावरणपूरक व हवामानानुकूल नागरी विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास पिंपरी चिंचवडच्या शाश्वत भविष्याची पावती आहे. हा निधी केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर हरित विकास घडवण्यासाठी वापरण्याचा महापालिकेचा मानस आहे. यावेळी बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक सुंदररामन राममूर्ती यांनीही पिंपरी चिंचवड महापालिकेचे अभिनंदन करताना बीएसईच्या कामकाजाबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयुक्तांचा सन्मान

पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘ग्रीन म्युनिसिपल बाँड लिस्टिंग’ केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचा ‘लिस्टिंग सन्मानचिन्ह’ देऊन गौरव करण्यात आला. हे सन्मानचिन्ह ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ यांच्या वतीने देण्यात आले.

हरित कर्ज रोख्यांबाबत थोडक्यात

पिंपरी चिंचवड महापालिका ही हरित कर्ज रोख्यांद्वारे निधी उभारणारी महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरली आहे. महापालिकेच्या या इश्यूला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, केवळ एका मिनिटात १०० कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला. एकूण ५१३ कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्या, म्हणजेच ५.१३ पट अधिक मागणी नोंदवली गेली. उभारलेला निधी निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प आणि गवळीमाथा ते इंद्रायणी नगर चौक टेल्को रस्ता विकास प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. हे दोन्ही प्रकल्प शहराच्या दीर्घकालीन शाश्वत विकास धोरणाचा भाग आहेत. या इश्यूला क्रिसिल आणि केअर या मान्यताप्राप्त पतमापन संस्थांकडून एए+ (AA+) पतमानांकन प्राप्त झाले असून, ७.८५ टक्के स्पर्धात्मक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. व्यवहार सल्लागार व मर्चंट बँकर म्हणून ए. के. कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड यांनी काम पाहिले. तसेच परतफेडीची हमी सुनिश्चित करण्यासाठी मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे एस्क्रो खाते तयार करण्यात आले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपत्रकार सुनील लांडगे यांना “भागवत धर्म प्रसारक पुरस्कार” जाहीर
Next Article पिंपरी-चिंचवड महापालिका ठरली देशात पहिली! – मुंबई शेअर बाजारात ग्रीन म्युनिसिपल बाँडचे लिस्टींग
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.