ताज्या घडामोडीपिंपरी

चातुर्मास प्रारंभ, गुरु पूर्णिमा आणि परमपूज्य प्रशांत ऋषीजी म सा यांचा जन्मोत्सव असा त्रिवेणी संगम कार्यक्रम दापोडी जैन स्थानकामध्ये उत्साहात संपन्न

Spread the love

 

दापोडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दापोडी येथील जैन स्थानकामध्ये आनंद शिष्य रत्न,जिनशासन प्रभावक, प्रवचन भास्कर प पू प्रशांत ऋषीजी म सा ,मधुर वक्ता प पू विजय स्मिताजी, प्रखरवक्ता प पू करुणाश्रीजी यांचा चातुर्मास या दापोडी येथील जैन स्थानकामध्ये संपन्न होत आहे. चातुर्मासाच्या प्रारंभीच्या दिवशी गुरु पूर्णिमा आणि आनंद शिष्य रत्न पू प्रशांत ऋषीजी म सा यांचा 65 वा जन्मदिवस हे ही कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले प पू प्रशांत ऋषीजी यांनी यांचा 65 वा जन्मदिन अनेक धार्मिक कार्यक्रम अनुष्ठान आणि गुणांवर कुणाल वाद या माध्यमातून संपन्न झाला प्रशांत ऋषीजी महाराज हे आचार्य सम्राट आनंद ऋषीजी यांच्या शिष्य असून गेले ४६ वर्षापूर्वी त्यांनी संतत्वाची दीक्षा घेतलीआहे .

आगमवाणीचा सखोल अभ्यास, प्रभावी वक्तृत्व ,भक्तीगीताचे सुंदर गायन आणि आपल्या सुंदर अमृतवाणी च्या माध्यमातून भगवान महावीरांची वाणी भाविकापर्यंत पोहोचवण्याचं काम ते अनेक वर्षांपासून ते करत आहेत. ते अभ्यासु वक्ते, उत्तम कवी, उत्तम गायक आणि उत्तम प्रबोधनकार आहेत. हा चातुर्मास अध्यात्मिक दृष्टीने एक ऐतिहासिक चातुर्मास संपन्न होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला याप्रसंगी प पू प्रशांत ऋषीजी महाराज यांच्या जीवनावर डॉ अशोककुमार पगारिया, दिलीप भन्साळी ,विलास राठोड, सुभाष लुंकड , इच्छाबाई बोरा ,राखी छाजेड, राजेंद्र काटे, नाना काटे, राहुल जवलकर, पारस लुंकड ,माई काटे , ललिता ओसवाल, मंगला भंसाली, ललिता लुंकड़, सुनंदा कर्णावट, कल्पना शिंगवी, डॉ स्नेहल गांधी, अजय बलदोटा, लता पगारिया, संदीप फुलफगार , सुरेश धालीवाल, गणेश मुथा, अशा अनेक वक्त्यांनी महाराजांच्या चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले व त्यांचे अभिष्ट चिंतन केले .सुरुवातीला दापोडी बहुमंडळ यांनी स्वागत गीत सादर केले त्यानंतर महाराज साहेबांच्या जीवनावर पिंपळे गुरव महिला मंडळाने एक स्तवन सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष दिलीप भन्साळी यांनी केले. महाराजसाबच्या जन्मदिनानिमित्त १३० तपस्वींनी एकासना तप केले . कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सतीश लुंकड़, सुनील कोठारी, आनंद बाफना, लीलाचंद लूणावत आणि बहुमंडळ / युवक मंडळ यांनी परिश्रम घेतले, रमणलालजी लुंकड़, , रविंद्र बलाई ,निर्मला छाजेड़, श्रेयस पगारिया , रमणलाल शिंगवी, नितीन बाठिया, विलासकुमार पगारिया,सुरेश गदिया आदि मान्यवर उपस्थित होते।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button