मोशीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान

मोशी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात आयोजित महा रक्तदान शिबिरा अंतर्गत मोशीत आयोजित रक्तदान शिबिरास सामाजिक बांधिलकीतून रक्तदात्यांनी रक्तदान उत्साहात प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. या शिबिरात ११३ रक्तदात्यांनी रक्तदान करीत शिबिरास प्रतिसाद दिला.
मोशी येथील निलेश बोराटे यांच्या कार्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान श्रेष्ठदान वाचावी गरजू रुग्णांचे प्राण आरोग्य सेवेतील सामाजिक बांधिलकीचे कार्यास भाजपाचे नेते निलेश बोराटे यांनी शिबिराचे आयोजन केले होते. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ११३ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. रक्तदात्यांना सन्मानपत्र व भेट वस्तू देऊन सामाजिक बांधिलकीतून सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे , सामाजिक कार्यकर्ते योगेश तळेकर अतुल बोराटे ,संजय बोराटे, गणेश बोराटे, जीतूभाऊ बोराटे, ऋषिकेश बोराटे ,स्वप्निल बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.
राज्यात आयोजित शिबिरात प्रत्येक मंडळ निहाय रक्तदान शिबिरास कार्यकर्ते पदाधिकारी रक्तदाते यांनी सामाजिक बांधिलकीतून उत्साहात रक्तदान करीत प्रतिसाद दिला.













