Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा निकाल जाहीर होताच चऱ्होली बु., मोशी आणि डुडुळगाव परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक ३ मधून मा. महापौर नितीनआप्पा काळजे यांनी तब्बल १९,६२५ मतांची विक्रमी आघाडी घेत तिसऱ्यांदा हॅट्रिक साधत दणदणीत विजय मिळवला. हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून, गेल्या दशकभरातील विकासकामांवर जनतेने दाखवलेल्या ठाम विश्वासाचे प्रतीक मानला जात आहे.

भोसरी विधानसभेचे आमदार  महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीनआप्पा काळजे यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला. त्यांच्या महापौर कार्यकाळात प्रभाग तीनमध्ये झालेला कायापालट आज ठळकपणे दिसून येतो. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, आरोग्य अशा मूलभूत सुविधा सक्षमपणे उभारल्यामुळे परिसरात वेगाने शहरीकरण झाले असून गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत.

अहोरात्र नागरिकांच्या अडचणींना धावून जाणारे, समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून नितीनआप्पा काळजे यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच संपूर्ण पॅनलचा विजय झाला, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विकासाचे ठोस मॉडेल, लोकाभिमुख धोरणे आणि प्रामाणिकपणा यामुळेच आप्पांसह श्री. सचिनभाऊ तापकीर, सौ. अर्चनाताई सस्ते, सौ. सारिका गायकवाड यांनीही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सर्वाधिक मते व मोठी आघाडी घेत आपले स्थान प्रथम क्रमांकावर कोरले आहे.
तिसऱ्या कार्यकाळात नितीनआप्पा काळजे यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. प्रभागासह संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास, नवनवीन प्रकल्पांची अंमलबजावणी आणि तरुणांसाठी रोजगारनिर्मिती यावर विशेष लक्ष दिले जाईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
या विजयामुळे चऱ्होली, मोशी आणि डुडुळगाव परिसराला नवी गती मिळून हा भाग ‘हायटेक’ ओळखीने ओळखला जाईल, असा ठाम विश्वास जनतेला आहे.

प्रचारादरम्यान केलेली विकासकामांची मांडणी आणि भविष्यातील बदलत्या अपेक्षांनुसार सादर केलेला “नवीन व्हिजन” यामुळे नितीनआप्पा काळजे यांचा विजय निश्चित मानला जात होता आणि निकालाने त्यावर शिक्कामोर्तब केले.
हा विजय आनंदासोबतच जबाबदारीची जाणीव करून देणारा असून, येणाऱ्या काळात प्रभागाची अधिक प्रगती होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version