पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निकालातून शहराच्या राजकारणात बदलाची स्पष्ट झलक पाहायला मिळाली आहे. १२८ जागांच्या सभागृहात तब्बल ६४ नवे चेहरे निवडून आले असून ६४ जुन्या नगरसेवकांनी पुन्हा प्रवेश मिळवला आहे. जनतेने अर्ध्या सभागृहाला नवे नेतृत्व देत अनुभव आणि बदल यांचा समतोल साधल्याचे चित्र दिसून येते.
नव्या नगरसेवकांमध्ये भाजपचे सर्वाधिक ४३ उमेदवार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. यामध्ये सोमन मोरे, सुजाता बोराटे, निखिल बो-हाडे, सारिका गायकवाड, अर्चना सस्ते, सचिन तापकीर, श्रुती डोळस, उदय गायकवाड, कृष्णा सुरकुले, कविता भोंगाळे, रेखा देवकर, राजश्री लांडगे, योगेश लांडगे, राणी पठारे, सुहास कांबळे, सुप्रिया चांदगुडे, कुशाग्र कदम, रिटा सानप, नीलेश नेवाळे, शितल वर्णेकर, शिवानी नरळे, अनिल घोलप, अर्चना करांडे, कैलास कुटे, धर्मपाल तंतरपाळे, पल्लवी वाल्हेकर, मनिषा चिंचवडे, मधुरा शिंदे, मंदार देशपांडे, कोमल काळे, तानाजी बारणे, कुणाल वाव्हळकर, रेश्मा भुजबळ, श्रुती वाकडकर, स्नेहा कलाटे, अर्चना तापकीर, अनिता काटे, कुंदा भिसे, रविना आगळकर, श्याम जगताप, ज्ञानेश्वर जगताप, पल्लवी जगताप, तृप्ती कांबळे यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून १७ नव्या नगरसेवकांना जनतेने संधी दिली आहे. विकास साने, यश साने, विराज लांडे, अश्विनी वाबळे, तुषार सहाने, सिद्धार्थ बनसोडे, सारिका मासुळकर, अरुणा लंगोटे, शेखर चिंचवडे, मनीषा लांडे, वर्षा जगताप, प्रियांका कुदळे, सागर कोकणे, योगिता बारणे, प्रतीक्षा लांघी, दीप्ती कांबळे आणि उज्जवला ढोरे हे प्रथमच सभागृहात प्रवेश करत आहेत.
शिवसेना (शिंदे गट) कडून ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, नीलेश तरस आणि विश्वजीत बारणे या चार उमेदवारांना पहिल्यांदाच नगरसेवक होण्याची संधी मिळाली आहे.
दरम्यान, २०१७ च्या निवडणुकीत विजयी ठरलेल्या २७ माजी नगरसेवकांचा यावेळी पराभव झाला आहे. यामध्ये अश्विनी जाधव, वसंत बोराटे, अनुराधा गोफणे, प्रियांका बारसे, संतोष लोंढे, सीमा सावळे, विलास मडिगेरी, सचिन चिखले, मीनल यादव, मोरेश्वर भोंडवे, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, अश्विनी चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, जयश्री गावडे, सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, उषा वाघेरे, उषा काळे, मयुर कलाटे, रेखा दर्शिले, तुषार कामठे, चंद्रकांत नखाते, शितल काटे, उषा मुंढे, रोहित काटे आणि उषा ढोरे यांचा समावेश आहे.
एकूणच या निकालातून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नव्या नेतृत्वाला संधी देतानाच अनुभवाला दुजोरा दिल्याचे स्पष्ट होते. येत्या काळात हे नवे- जुने मिश्र सभागृह शहराच्या विकासाला कोणती दिशा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
