ताज्या घडामोडीपिंपरी

गणेश मूर्ती विसर्जन घाटावर स्वयंस्फूर्तीने सामाजिक संस्थांचे काम,3,600 गणेश मुर्तीचे संकलन

Spread the love

 

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – मानवी हक्क संरक्षण आणि जागृती आणि दिलासा ,बेसिक टिम ,ड प्रभाग आरोग्य विभागाच्या वतीने पिंपळे गुरव येथील गणेश विसर्जन घाटावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचारी बरोबरच स्वयंस्फूर्तीने काम करून गणेश मुर्तीचे संकलन करण्यात आले.

महापालिकेने ठेवलेल्या गाड्यांमध्ये गणेश मूर्ती ठेवण्याचे काम केले. निर्माल्य गोळा करण्याचे काम,तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत चालावी यासाठी देखील काम केले.

यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले, गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी मूर्तीदान करा! असा संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले होते. कृतिशील काम म्हणून गणपतीच्या पाचव्या,सातव्या,नवव्या,दहाव्या, आकराव्या दिवशी दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्या समवेत उत्स्फूर्तपणे काम करून 3,600 गणपती मूर्ती संकलन व अंदाजे 6 टन निर्माल्य जमा झाले. दोन्ही संस्थांचे हे पहिलेच गणपती संकलनचे पालीकेबरोबरचे पहीलेच वर्ष आहे असे जोगदंड यांनी सांगितले.

यावेळी महानगरपालिकेच्या ड प्रभागाचे सहाय्यक आरोग्यधिकारी शांताराम माने म्हणाले.. ” स्वयंसेवी संस्थेचा सहभाग  पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित मूर्तीदान उपक्रमासाठी होत आहे याचे कौतुक वाटते असे गौरवोद्गार काढले आणि एकही गणेश भक्ताने नदीमध्ये किंवा नदीच्या पात्रात गणेशाचे विसर्जन केले नाही ही गोष्ट कौतुकास पात्र आहे, आणि पर्यावरण आणि नदी प्रदूषणाचे महत्त्व ही गणेश भक्तांना पटले आहे असे माने म्हणाले.
प्रभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे म्हणाले की नियोजनबद्ध मूर्ती संकलनचा कार्यक्रम पार पडला.आणि गणेश भक्तांनीही आम्हाला यापुढे सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले, की सर्व दिवशीही विसर्जन होईपर्यंत आमच्या दोन्ही संस्थेचे कार्यकर्ते पालिकेच्या आरोग्य विभागाबरोर  गणेश मुर्तीसंकलन,व वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी आणि गणपती ट्रकमध्ये चढविण्यासाठी मदत करत होते.
यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक,ड प्रभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने ,मुख्य आरोग्य प्रमुख शंकर घाटे,आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार,मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड,स्थापत्य अभियंता ,चंद्रकांत पाटील,गजानन धाराशिवकर, कनिष्ठ अभियंता लक्ष्मण इटकर,आरोग्य विभागाचे शिवाजी निम्हण, मुकादम अजित रोकडे, बेसिक टीमचे शुभम बेंद्रे,सागर पाटील’ मारुती कांबळे,राहुल चव्हाण महाराष्ट्र सुरक्षा बलचे,दिपक टकले,जनार्दन खेडकर,अस्मिता खैरनार, गुणवंत कामगार शंकर नाणेकर ,काळुराम उमेश राठोड,मनोज पवार,अतिश गायकवाड,कुमार राठोड गोविंद,राठोड लांडगे,शेषराव अटकोरे,सह अनेक गणेश भक्तांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button