Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»आळंदी»“ज्ञानराज माऊलीच्या नाम गजरात” अलंकापुरीत संजीवन समाधी दिन सोहळा साजरा
आळंदी

“ज्ञानराज माऊलीच्या नाम गजरात” अलंकापुरीत संजीवन समाधी दिन सोहळा साजरा

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com17 November 2025No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ज्ञानराज माऊली नाम गजर…. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल….. मृदंग, वीणेसह टाळांचा नाद,… आणि नामदास महाराज यांच्या हृदयस्पर्शी कीर्तन सेवेत संत महिमा…हरिनाम जयघोष करीत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधीवर तुळशी फुलांसह विविध रंगी फुलांच्या पाकळ्यांची भाविकांनी केलेली पुष्पवृष्टी झाली. आळंदी मंदिरात घंटानाद होताच हृदयस्पर्शी वातावरणात माऊलींचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा सोमवारी ( दि. १७ ) साजरा झाला. मंगळवारी ( दि. १८ ) श्रींचा वैभवी छबिना पालखी मिरवणुकीने हरिनाम गजरात सोहळ्याची सांगता होणार असल्याचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांनी सांगितले.

या वेळी सोहळ्यास संत नामदेवरायांचे वंशज नामदास महाराज परिवार, आळंदी संस्थानचे सरपंच प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त अॅड.राजेंद्र उमाप, रोहिणी पवार, निलेश महाराज लोंढे कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील, भावार्थ देखणे, पंढरपूर देवस्थान समिती सदस्या अॅड. माधवी निगडे, चोपदार बाळासाहेब रणदिवे, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, मानकरी योगेश आरू, व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने, श्रीधर सरनाईक, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, उपव्यवस्थापक संजय रणदिवे, श्रीधर सरनाईक, आळंदी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कीर्तनकार, प्रवचनकार, फडकरी, दिंडीकरी, मानकरी उपस्थित होते.

मंदिरातील विना मंडपात परंपरेने संत नामदेवराय यांचे वंशज माधव नामदास महाराज यांची माऊलीचे जीवन चरित्रावर आधारित हृदयस्पर्शी कीर्तन सेवा रुजू केली. दरम्यान विना मंडपा समोर महाद्वारात श्री गुरु हैबतरावबाबा आरफळकर याचे वतीने पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे वतीने कीर्तन सेवा झाली. तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात श्रींचे संजीवन समाधी प्रसंगावर आधारित विविध ठिकाणी कीर्तन सेवा सुश्राव्य वाणीतून राज्यातील नामवंत कीर्तनकार महाराजांनी रुजू केली. तसेच आळंदी परिसरात ठिक ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवन कार्यावर आधारित कीर्तन सेवा तसेच समाधी प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा सुश्राव्य वाणीतून नामवंत महाराजांनी सादर केली.
संत नामदेव महाराज यांचे अभंगावर आधारित वंशज माधव महाराज नामदास यांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या हृदयस्पर्शी वाणीतून कीर्तन सेवा केली. माऊलींचे संजीवन समाधी सोहळ्यात कीर्तन करीत असताना महाराजांचे डोळ्यांतून अनेक वेळा आश्रुंचा बांध फुटला. यावेळी अनेक भाविकांच्या नेत्रांचे कडा देखील पान्हवल्या. माऊलींचे समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तनात भक्त भारावले. यावेळी नामदास महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवन चरित्र अनेक संतांच्या संत वचनाचे दाखले प्रमाण देत सांगत कीर्तन सेवा रुजू केली. आळंदीत श्रीचे संजीवन समाधी प्रसंगाचे वर्णन आणि जीवन चरित्र श्रवण करताना अनेक नागरिक,वारकरी, भाविकांच्या डोळ्याच्या कडाही पान्हावल्या आणि श्रीचे संजीवन समाधी प्रसंगाच्या कल्पनेने उपस्थित भाविकही गहिवरुन गेले. माधव महाराज नामदास यांचे हृदयस्पर्शी कीर्तन सेवेत भक्ती चैतन्यमयी वातावरणात श्रीच्या संजीवन समाधी सोहळा प्रसंगावर कीर्तन झाले.

माउलीचे मंदिरात श्रीचे संजीवन समाधी दिनास विविध धार्मिक कार्यक्रमांनी भल्या पहाटेच सुरुवात झाली. पहाटे पवमान अभिषेक, दुधारती आळंदी देवस्थानचे सरपंच प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांचे हस्ते प्रथा परंपरेप्रमाणे झाली. या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांच्यासह नामदास महाराज परिवार उपस्थित होते.

संत नामदेवराय यांचे वतीने नामदास परिवारातर्फे महापूजा परंपरेने करण्यात आली. तसेच मंदिरात भाविकांच्या देखील चल पादुकांवर महापूजा झाल्या. दर्शन कमी वेळेत जास्त भाविक कसे घेतील या साठी प्रभावी नियोजन करण्यात आले होते. कीर्तन सेवा रुजू करून हैबतरावबाबा यांचे दिंडीची मंदिरात हरीनाम गजरात प्रदक्षिणेस प्रवेश झाला. श्रींचे गाभा-यात संत नामदेवराय पादुकासह श्रीची पूजा, आरती, श्रींचे संजीवन समाधी समीप नामदेवरायांचे वैभवी पादुकांची पूजा झाली. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, माउली ज्ञानोबा, माउली, ज्ञानोबा-तुकाराम असा नामजयघोष होताच घंटानाद करण्यात आला. यावेळी मंदिरावर पुष्प वृष्टी झाली. फुलांची मुक्त उधळण, तुळशी पत्रे मंजी-याचा श्रीचे संजीवन समाधीवर पुष्पवृष्टीत भाविकांनी वर्षाव केला. कीर्तनसेवा संपताच श्रीची आरती झाली, दरम्यान गाभा-यात आरती, घंटानादा नंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी च्या वतीने प्रमुख मानकरी, पदाधिकारी, सेवक यांना नारळ प्रसाद देण्यात आला. श्रीना महानैवेध्या नंतर सोपानकाका देहूकर यांचे वतीने कीर्तन सेवा उत्साहात झाली. हैबतरावबाबा यांचे तर्फे हरीजागर सेवा झाली. आळंदी पंचक्रोशीत सोहळ्या निमित्त कीर्तन सेवा, महाप्रसाद वाटप हरिनाम गजरात झाला. दरम्यान भोजलिंग काका मंडपात दाणेवाले निकम दिंडी तर्फे किर्तन सेवा झाली.

संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा लावून पंचामृत अभिषेक पूजा अकरा ब्रम्ह्वृंदांच्या वेद मंत्र जयघोषात पूजा बांधली . श्रींचे संजीवन समाधी दिनी पहाट पूजेचे वेदमंत्र जयघोषात पठन पौरोहित्य आळंदीतील ब्रम्हवृंदांचे वेदमंत्र जयघोषात केले. श्रींचे संजीवन समाधी सोहळ्यात पहाट पूजेत पौरोहित्य वेद मंत्र जय घोष करीत रूद्राभिषेक व पवमान अभिषेक प्रथा परंपरेचे पालन करीत केला.
मंदिरात आकर्षण विविध रंगी फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधले. माऊलीना लक्षवेधी पोशाख व मंदिरात आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली. विद्युत रोषणाई सेवा मोठ्या प्रमाणात झाल्याने मंदिराचे अंतरंग व बाह्यरंग लक्षवेधी रोषणाईने उजळून निघाले. यावर्षीची पुष्पसजावट व विद्युत रोषणाई सेवा लक्षवेधी ठरली. रंगावलीने यात आणखी भर घातली. स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर, महिला अध्यक्षा आशा तापकीर यांचे मार्गदर्शनात मंदिरात विशेष स्वच्छता सेवा देण्यात आली. यासाठी सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

आळंदीत कार्तिकी यात्रा चोख व्यवस्थेने समाधानी असल्याचे आळंदीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. यावर्षी आळंदी कार्तिकी यात्रेत सुसंवादास प्राधान्य दिल्याने यात्रेचे नियोजन ठरल्या प्रमाणे प्रशासनाने कामकाज केले. यातून भाविकांसह नागरिकांना सुविधा देता आल्या. यात्रा काळात नागरी सुविधां बाबत भाविकांची तसेच नागरिकांची सोय केली. यावर्षी भाविकांच्या आरोग्याची तसेच सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली. यात्रेसाठी आळंदी देवस्थान तसेच जिल्हा महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासनाने देखील सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. आळंदी कार्तिकी यात्रा काळात पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडा, प्रांत अनिल दौन्डे तहसीलदार प्रशांत बेडसे, मंडलाधिकारी, आळंदी देवस्थानचे सर्व विश्वस्त, व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे, आळंदी व दिघी पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा कर्मचारी वृंद आदींनी केलेल्या नियोजना प्रमाणे कामकाजात परिश्रम घेतले. यामुळे आळंदीतील यात्रेचे नियोजन व्यवस्थित पार पडले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleप्रभाग क्रमांक १४  मध्ये बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त  आरोग्य उपक्रम
Next Article महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शहर प्रदूषणाच्या विळख्यात – खासदार श्रीरंग बारणे यांचा आरोप
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.