Spread the love

चऱ्होली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चऱ्होलीतील,काळे कॉलनीतील ॲड. सचिन काळे युवा मंचचे अध्यक्ष ॲड.सचिन काळे यांना भारत सरकारने नुकतीच नोटरी म्हणून नियुक्ती केली असून ते चऱ्होली परीसरातील पंचक्रोशीतील  सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. व्यवसायाने ते वकील असून गेली 17 वर्षांपासून ते वकिली सोबतच गोरगरिबांना मोफत कायदेविषयक सल्ला व सेवा देत असतात.

स्मित भाषिक असून साधी राहनी ही त्यांची खासियत असून त्यांनी अनेक अनाथआश्रमात ,वृद्धाश्रमत तसेच गरजूंना अन्नदान ते नेहमी करत असतात . मला “समाजाचे काहीतरी देणे आहे ‘आणि ते दिले गेले पाहिजे “या मानवतेच्या  भावनेतून ते नेहमी समाजसेवा मदत करत असतात .यावेळी अँड. सचिन काळे म्हणाले की माझ्या व्यवसायातील काही आर्थिक मदत मी नेहमीच गोरगरिबांना मदत करत आलोय आणि यापुढे करत राहील. मला भारत सरकारने नोटरी म्हणून नियुक्त केलेली केले आहे या पदाचा उपयोग मी गोरगरिबांना न्याय व सेवा देण्यासाठी करेल असा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version