निशा यादव यांची कुदळवाडी मनपा शाळा येथे सखी सावित्री समिती सदस्यपदी नियुक्ती
शाळेमध्ये अनुचित घटना घडु नये म्हणून समितीची स्थापना
चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज पी.सी. एम. सी. पब्लिक स्कूल कुदळवाडी क्र. ८९ शाळेमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्याची सुरक्षा त्यांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेण्याचा उद्देश या समिती स्थापन करण्यामागचा आहे. त्याप्रसंगी निशा यादव व डॉ. सुजाता यादव , सौ. गायकर मॅडम चौधरी मॅडम , महिला पालक आश्विनी कांबळे व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक संपत पोटघन यांनी समितीची रूपरेषा , कार्य व उपाययोजना यांची माहिती दिली.
जेणेकरून शालेय वातावरण आनंदी , सुदृढ व भीतिमुक्त राहील आणि सर्व विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शिक्षण मिळेल. समितीची दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मिटींग घेण्याचे ठरले. समिती मध्ये महिला शिक्षक , महिला पालक , विद्यार्थिनी , महिला डॉक्टर व स्थानिक महिला व सचिव म्हणून मुख्याध्यापक यांचा समावेश करण्यात आला.