ताज्या घडामोडीपिंपरी

पीसीईटीचे राष्ट्रीय डीडी – रोबोकॉन स्पर्धेत घवघवित यश 

Spread the love
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी दिल्ली येथे दूरदर्शन आणि आयआयटी यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय रोबोटिक “डीडी रोबोकॉन २०२४” या नामांकित स्पर्धेत पीसीसीओई च्या ‘टीम ऑटो मॅटन्स’ च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम उपविजेता पदाचे बक्षीस पटकावले.
   स्पर्धेत या वर्षी व्हिएतनामची ‘हार्वेस्ट डे’ ही थीम होती. पीसीसीओई च्या संघाने सलग बाराव्या वर्षी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असुन या टीममध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग (एआयएमएल) विभागातील ४० विद्यार्थ्यांचा समावेश होता.
    विद्यार्थ्यांनी एक मॅन्युअली ऑपरेट केलेला आणि दुसरा पूर्णपणे स्वयंचलित अशा दोन रोबोट्सची रचना आणि निर्मिती सादर केली. मॅन्युअल रोबोट नियुक्त केलेल्या ठिकाणी रोपे लावू शकतो आणि स्वयंचलित रोबोट सिलोसमध्ये धान्य हस्तांतरित करू शकतो.
    तीन टप्प्यात झालेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करून अंतिम फेरीत “डीडी रोबोकॉन २०२४” मध्ये राष्ट्रीय प्रथम उपविजेता क्रमांक पटकावला.
     अमेय अग्निहोत्री, रूपेश कुमावत, आदित्य शिंदे, अभिषेक ननावरे, विराजस जोशी, निलेश नागुरे यांचा प्रमुख सहभाग होता. प्रा. डॉ. संजय माटेकर आणि प्रा. डॉ. वर्षा बेंद्रे यांनी मार्गदर्शन केले.
       पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button