ताज्या घडामोडीपिंपरी

प्रेरणा विद्यालयामध्ये भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा संपन्न

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रेरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक  तुकाराम गुजर आणि मानद सचिव  कांतीलाल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा विद्यालयामध्ये दिंडी सोहळा संपन्न झाला. ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात, श्रीविठ्ठल नाम जयघोष करत, भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पार पडला.

यावेळी विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी संतांच्या वेशभूषेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वप्रथम विठ्ठल रुक्मिणी,टाळ, मृदंग आणि पवित्र तुळशी यांच्या प्रतिमांचे मुख्याध्यापक महेंद्र पवार, मुख्याध्यापक कृष्णराव नाईकरे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, पर्यवेक्षक अर्जुन शेटे व प्रवीण कुऱ्हाडे यांच्या शुभहस्ते पार पडले.

यावेळी परिसरामध्ये टाळ-मृदंगाचा गजर करत पालखी सोहळा लक्ष्मणनगर येथील विठ्ठल मंदिरात दाखल झाला. तेथे विठ्ठलाची आरती घेतली. त्यानंतर परिसरातून विठ्ठल नामाचा जयघोष करत विद्यार्थ्यांनी पायी दिंडी सोहळा अनुभवला. विद्यालयात पुन्हा पालखी सोहळा आल्यानंतर त्या ठिकाणी अभंग आणि भक्ती गीते सादर केली.सर्व छोट्या वारकऱ्यांनी फुगड्यांचा देखील आनंद घेतला.
पालखी सोहळा उत्तम रित्या पार पडण्यासाठी माध्यमिक विभागाचे सांस्कृतिक प्रमुख गौतम दळवी,प्राथमिक विभागाच्या सांस्कृतिक प्रमुख ज्योती धुरपते यांनी नियोजन केले. सुनिता गोरे, मेघना चौगुले, मोहन परहर, ज्ञानेश्वर बोरसे, विजय जाधव,भीमराज शिरसाठ,दिलीप माळी, सनी मळेकर, इंदुमती जगताप, रेखा नांदोडे, अनीता कातुरे, अनिता साखरे, सोनाली वाघमारे, सुनीता राखुंडे, तसेच प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले . कलाशिक्षक दिलीप माळी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण केले.
होय होय वारकरी|
पाहे पाहे रे पंढरी||
असा हा अप्रतिम सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम दळवी आणि मोहन परहर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button