ताज्या घडामोडीपिंपरी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने  वृक्षारोपण

Spread the love

 

आजचे वृक्षारोपण, संवर्धन म्हणजे उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय.–कल्याण आयुक्त,रविराज इळवे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र उद्योग नगर, व चाकण यांच्या वतीने चाकण वनपरिक्षेत्र वराळे गावच्या बाजूला असलेल्या वनजमिनीवर वड, पिंपळ, आंबा, कुरंज,जांभूळ यासारखे 400 देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. येणाऱ्या हलक्या पावसाच्या सरीचा आनंद घेत जवळपास ८० विविध आस्थापनेतील कामगार, गुणवंत कामगार, विविध कंपणी,व प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्र.सहाय्यक कल्याण आयुक्त,मनोज पाटील यांनी केले.

फक्त पर्यावरण दिनानिमित्त झाडे न लावता पावसाळ्यात अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत माझ्यामुळे, वृक्षतोड होणार नाही मी प्रत्येक वर्षी पाच झाडे लावून ती जगेल अशी भीष्म प्रतिज्ञा प्रत्येकाने घेतली पाहिजे, जगामध्ये पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे, सूर्य आग ओकतोय,प्रदूषण वाढत चालले आहे ,”जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा, सोयरे वनचरे” अभंगाप्रमाणे आम्ही अधिकाधिक झाडे लावून प्रत्येकाने महिन्यातून एक दिवस तरी पर्यावरणासाठी दिला पाहिजे असे परखड मत महाराष्ट्र राज्याचे, कल्याण आयुक्त,श्री.रविराज इळवे यांनी वृक्षरोपण करताना कामगारांना आवाहन केले.आषाढाच्या पहिल्या दिवशी वृक्षारोपण केल्यामुळे खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टवर झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण टाळा, वृक्षतोड टाळा असा जनजागृतीचा शर्ट घालुन पर्यावराणाचा संदेश दिला.कल्याण आयुक्त,श्री.रविराज इळवे व त्यांच्या धर्मपत्नी सौ.सुजाताताई  इळवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी वनरक्षक सागर चव्हाण, ओम पवार वनरक्षक यांचा कल्याण आयुक्त, श्री.रविराज इळवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .
सर्व उपस्थित व कामगारांना कामगारभुषण डॉ मोहन गायकवाड यांच्या वतीने वनभोजन देण्यात आले .
यावेळी कामगार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त, श्री.रविराज इळवे व त्यांच्या धर्मपत्नी सौ.सुजाताताई इळवे ,पुणे विभागाचे, सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, सहाय्यक लेखा अधिकारी प्रमोद जोशी,वरिष्ठ लिपिक महादेव जाधव, कल्याण निरीक्षक, संदीप गावडे,कनिष्ठ लिपिक, योगेश कळंबे,संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कामगारभुषण डॉ.मोहन गायकवाड, श्री.अनिल कारळे, अरुण वाडकर,सुनील बोराडे, अविनाश राऊत, प्रतिभा येरम,शुभांगी नावडीकर,सुरेश पवार, सेवानिवृत्त केंद्र संचालक,अश्विनी दहीतुले,सह वनरक्षक अमोल पवार, सागर चव्हाण ,अचल गवळी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले तर श्री.संतोष कंक वनपरिक्षेत्र अधिकारी, योगीता विर,श्री अचल गवळी वनपाल चाकण यांचे सहकार्य लाभले 400 वेगवेगळ्या जातीचे झाडे लावून वृक्षरोपण करण्यात आले .

यावेळी संस्कार प्रतिष्ठानचे प्रभाकर मेसकर, मिलन गायकवाड ,तानाजी भोसले, राजेंद्र फडतरे, अनुषा पै सायली सुर्वे ,संध्या स्वामी, शिवराज शिंदे, गुणवंत कामगार काळूराम लांडगे, मुलांनी बशीरभाई, शंकर नाणेकर, गोरखनाथ वाघमारे ,संदीप पानसरे, मुरलीधर दळवी, सुनील खैरनार, बाळासाहेब साळुंके, संदीप रांगोळे, दत्तात्रय दगडे,प्रशांत चव्हाण, सुनील खैरनार, श्री.शिवराज शिंदे,मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष तथा गुणवंत कामगार आण्णा जोगदंड,व वेगळवेगवेगळ्या आस्थापनाचे कामगार व प्रतिनिधी उपस्थित होते.सुत्रसंचलन श्री प्रदिप बोरसे केंद्रप्रमुख यांनी केले तर आभार श्री अविनाश राऊत केंद्र प्रमुख यांनी सर्वाचे आभार मानले. वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र सेवक श्री. पारस्कर, श्रीवास, शहापूरकर या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button