ताज्या घडामोडीपिंपरी

संत निरंकारी सत्संग भवन भोसरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस  साजरा 

Spread the love

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संत निरंकारी मिशनच्या वतीने दिनांक २१ जून, २०२४ रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिनी’ मिशनच्या विविध शाखांमध्ये सकाळी ६:३० ते ८:०० पर्यंत स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या जागांमध्ये तसेच संत निरंकारी सत्संग भवन मध्ये साजरा करण्यात आला. पुणे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या संत निरंकारी सत्संग भवन, गंगाधाम आणि भोसरी सहित पुण्यातील मिशनच्या विविध सत्संग भवनांमध्ये २९ ठिकाणी योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते मिशनच्या भोसरी येथील सत्संग भवनमध्ये २५० हुन अधिक साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या मध्ये भोसरी परिसरातील जिजामाता शाळेतील १५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी या मध्ये सहभाग घेतला होता. योग प्रशिक्षक श अनंत सकपाळ यांनी योगांची विविध प्रात्यक्षिके करून घेतली.

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या निर्देशनामध्ये आध्यात्मिक जागरूकतेला अधिक महत्व देत असतानाच समाज कल्याण उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, महिला सशक्तिकरण, बाल विकास, युवकांच्या ऊर्जेला सकारात्मक मार्गदर्शन देत अनेक परियोजना कार्यान्वित करुन संचलित केल्या जात आहेत. मिशन मार्फत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांबद्दल नेहमीच प्रशंसेस पात्र ठरलेले आहे. सद्गुरु माताजी म्हणतात आपल्या सर्वांमध्ये आध्यात्मिक जागृती तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहू ज्यायोगे आपला सर्वांगिण विकास होऊ शकतो. याकरिता आपण स्वास्थ्य जागृतीसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे, जेणेकरुन आपण तना-मनाने स्वस्थ राहू शकू.
योग ही भारताच्या प्राचीन परंपरेतील एक अमूल्य देणगी आहे. हे व्यायामाचे एक असे प्रभावशाली स्वरूप आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शारीरिक अवयवच नव्हे तर मन, बुद्धी, आत्म्याच्या दरम्यान संतुलन निर्माण केले जाते. त्यामुळेच योगाद्वारे शारीरिक व्याधिंच्या व्यतिरिक्त मानसिक समस्यांचेही निराकरण केले जाऊ शकते. निरंतर योगाभ्यासाने तल्लख बुद्धी, स्वस्थ हृदय, सकारात्मक भावनांची जागृती आणि शांतीसुखाने युक्त अशी जीवनशैली शक्य आहे. आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करुन आपण केवळ तनावमुक्तच राहू शकतो असे नव्हे तर एक आनंदी व सहजसुंदर जीवन जगण्याची कलाही आपल्याला प्राप्त होते. सध्याच्या धावपळीच्या युगात योगाची नितांत आवश्यकता आहे. जगातील जवळपास सर्व देशांकडून या योग संस्कृतीचा सहजपणे अंगीकार केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button