जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळानिमित्त आवश्यक त्या उपाययोजना करा – निखिल दळवी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२४ निमित्त योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युवासेना पिंपरी चिंचवड शहर उपशहर प्रमुख उबाटा निखिल उमाकांत दळवी यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जून महिन्यांमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
आषाढी वारी ३३९ व्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सन २०२४ श्री क्षेत्र देहू येथून दिनांक २८ जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम पिंपरी चिंचवड शहरांमधील आकुर्डी गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठलवाडी येथे असतो याही वर्षी पहिला मुक्काम आकुर्डी मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दिनांक ३० जून रोजी असणार आहे त्याकरता आवश्यक असणाऱ्या पालखी मार्ग मधील स्थापत्य विषयक कामे हाती घ्यावी व पालखी सोहळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करावी पालखी सोहळ्यानिमित्त आकुर्डी मधील विठ्ठल मंदिर येथील पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक भाविक भक्त वारकरी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये येत असतात पालखी सोहळ्या दरम्यान आकुर्डी परिसरामध्ये मोठी गर्दी होत असते संत तुकाराम महाराज यांच्या पालखी च्या दर्शना कारता येणाऱ्या वारकरी भाविक भक्त यांच्या राहण्याची जेवण्याची व्यवस्था मनपाने करावी तसेच जागोजागी पिण्याच्या पाण्याची व वापरण्याच्या पाण्याची सोय करावी वारकरी भाविक भक्त व नागरिकांसाठी फिरते शौचालय व्यवस्था करणे गरजेचे आहे.
पालखी सोहळ्या दरम्यान वारकरी भाविकांसाठी सर्वच ठिकाणी आरोग्य विषयक वैद्यकीय सेवा उपलब्ध कराव्यात पालखी मार्ग मधील अडचणी लक्षात घेता पालखी मार्ग वरील अतिक्रमण त्वरित हटवावे पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत परंतु ८० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.
तरी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चालू करण्यात यावे जगद्गुरू संत तुकाराम महाराज सोहळ्यासाठी लागणाऱ्या सर्वच उपाय योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पालखी सोहळ्यापूर्वी लवकरात लवकर करण्यात याव्या, असे निवेदनात म्हटले आहे.