राजनाथ सिंह यांच्याकडून गरिबांचा अवमान – काशिनाथ नखाते
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- भारतामध्ये महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, आज ही देशातल्या असंख्य लोकानां दोन वेळच्या जेवण जेवणाची भ्रांत असलेल्या,अत्यंत बिकट परिस्थिती असलेल्या नागरिकांची अवमान देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह करीत आहेत. मोफत रेशन योजनेच्या अंतर्गत नागरिकांना गरजेपेक्षा जास्त धान्य मिळत असल्याने ते बाजारात विकत आहेत असा दावा त्यांनी केला हे अत्यंत चुकीचे असून बेरोजगार आणि उपासमारीने मरणाऱ्या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका यांनी राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन,असंघटित कामगार विभागातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत १११ व्या स्थानावर आहे. भारताचा स्कोर २८.७ आहे, ज्यात उपोषण, बालकांचे वजन कमी होणे,बालकांची उंची कमी होणे,आणि बालमृत्यू यांचा समावेश आहे. भारतात बालकांचे वेस्टिंग दर १८.७ आहे, जो जगात सर्वात जास्त आहे, आणि बालकांचे स्टंटिंग दर ३५.७ आहे, जो उच्च दरांपैकी एक आहे वास्तविक भारताच्या या भुखमारीच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी, पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना आवश्यक होत्या मात्र ते केल्या नाहीत. रेशन धान्य वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे गरजेचे आहेत. रेशनवर मिळणारे धान्य माणसांना न देता मोठ्या प्रमाणात काही दलालामार्फत जनावरांना घालण्याचा प्रकारही काही ठिकाणी उघडकीस येत असल्याच्या बातम्या आहेत. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला आनंदाचा शिधा हा दोन सण झाले तरी अजूनही नागरिकांना मिळालेला नाही.
देशातील नागरिकांना अल्पदरात रेशनवर अथवा मोफत धान्य देणे हे सरकारचे कर्तव्यच असताना सुद्धा हे सरकार वारंवार वृत्तपत्र जाहिरातीतून, दूरदर्शन मधून जाहिराती करून आपण देशातील नागरिकावर उपकार करत आहोत असे भासवण्याचा प्रकार वारंवार होत आहे हे अत्यंत चुकीचे असून जनता आता याबाबत जागे झालेली आहे.