स्मार्ट सिटीतील कृष्णा चौक नवी सांगवी येथील खड्ड्याचे काम पावसाळ्यापूर्वी करा- मेघराज लोखंडे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कृष्णा चौक नवी सांगवी येथील खड्ड्याचे काम पावसाळ्यापूर्वी करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मेघराज लोखंडे यांनी ह क्षेत्रीय कार्यालय उपअभियंता स्थापत्य 6यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट सिटी अंतर्गत महानगरपालिकेने रस्त्याचे काम केले. पण कृष्णा चौक नवी सांगवी पाटील प्लाझा,बारामती ॲग्रो चिकनच्या दुकानासमोर समोर मोठा खड्डा असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळ्यामध्ये त्या खड्ड्यात पाणी भरून दोन दुचाकी सवार मुलांचा अपघात त्या ठिकाणी झालेला असून आपत्कालीन
अपघात होण्याची दाट शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात नागरीकांच्या काही तक्रारी देखील येत असल्याचे मेघराज लोखंडे यांनी म्हटले आहे. या संदर्भात मेघराज लोखंडे यांनी उपअभियंता स्थापत्य विभाग ह क्षेत्रीय कार्यालय येथे निवेदन दिले आहे. कृष्णा चौक नवी सांगवी रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी मेघराज लोखंडे (चिंचवड विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार) यांनी केली यावेळी नवी सांगवी प्रभाग ४५ अध्यक्ष अभिषेक मेमजादे,अभिषेक गिरी व कौस्तुभ नितनवरे उपस्थित होते.