शहरातील होर्डिंग सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्रक्चर ऑडीट करण्यात यावे – नाना काटे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील होर्डिंग सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्रक्चर ऑडीट करण्यात यावे , अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच मुंबई येथील घाटकोपर परिसरात होर्डिंग दुर्घटना झाली त्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे, हि खूप दुख:द व गंभीर बाब असून प्रशासनाच्या दुर्लक्ष व हलगर्जी पणामुळे हि घटना घडली आहे, याच धर्तीवर आपल्या पिंपरी चिंचवड शहरात अनेक परवाना धारक व अनधिकृत होर्डिंग आहेत.
पावसाळा देखील काही दिवसांवर आला असून , या पावसाळ्याच्या दिवसात वादळ व मुसळधार पावसाची शक्यता आहे अशातच काही होर्डिंगमुळे दुर्घटना घडू नये त्यासाठी खबरदारी म्हणून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील होर्डिंग चे सुरक्षेचा द्रुष्टीने स्ट्रक्चर ऑडीट करण्यात यावे, व दोषीवर कारवाई करण्यात यावी













