विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आढळराव पाटील यांना विजयी करा – अजित पवार
उरुळी कांचन , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महायुतीचे अधिकृत उमेदवार उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उरुळी कांचन येथे जाहीर सभा झाली. या सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर आपल्याला शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करावे. समोरचा उमेदवार हा कुठलेही प्रश्न मार्गी लावू शकला नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या.
सत्तेतून प्रश्न मार्गी लागतात म्हणून आम्ही सरकारमध्ये गेलोआहोत. मी कामाचा माणूस आहे. एक घाव दोन तुकडे करणारा व्यक्ती आहे. उरळी कांचन करांनो समोरच्या व्यक्तींला खासदार की मध्ये काहिच रस नाही. त्यामुळे आपल्यासाठी कामाची असणारी व्यक्ती म्हणजे आढळराव पाटील आहेत, त्यांना विजयी करा. थेऊर कारखाना सुरु करणे, उपबाजार, ट्रँफिक असे सर्व प्रश्न आपण मार्गी लावू.
दरम्यान,यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप कंद, प्रतापराव गायकवाड, मंगलदास बांदल, राजाराम कांचन, महादेव कांचन, सुनिल कांचन, संतोष कांचन, दिलीप वाल्हेकर, दिलीप काळभोर, अलंकार कांचन, शुभम खोमणे, विकास जगताप, रवी बापू काळे, अमित कांचन, दादा पाटील फराटे, रवींद्र कंद, सुभाष जगताप, नवनाथ काकडे, ज्योती थोरात, मोहन जवळकर, अक्षय आढळराव पाटील, चारुशिला कांचन, चंदन सोंडेकर, दादासाहेब सातव, सुभाष काळभोर, अभिजीत बोऱाडे, स्वप्नील ढमढेरे, आण्णा महाडिक, मिलिंद हरगुडे, जयेश कंद, एल बी कुंजीर, भाऊ चौधरी, रंजिता गाढवे, ज्योती थोरात, लोचन जिवले, नितीन गोते, शामराव गावडे, विपुल शितोळे, किर्तीताई कांचन, संचिताताई कांचन, विकास रासकर, मोरेश्वर काळे, पुणमताई चौधरी, उत्कष गोते, रामदास चौधरी, जी. बी. चौधरी, श्रीकांत कांचन, निखिल तांबे, राजेंद्र कोरेकर, सुधीर फराटे, सारिका लोणारे, अक्षय शिंदे आदी महायुतीच्या घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “अनेकदा मी उरुळी कांचनला आलो आहे. अनेक सभा घेतल्या आहेत. तुम्ही पण मला 33 वर्षे झाली 91 साली मला खासदार म्हणून निवडून दिले होते. तसा आपला जुना संबंध आहे. ही निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातात द्यायची. देश कोण योग्य दिशेने घेऊन जाईल याबाबतची आहे. कोणाच्या विचाराचा खासदार दिल्लीमध्ये निवडून पाठवायचा आहे याबाबतची ही निवडणूक आहे. मागील काळातील 2004, 2009 व 2014 अशा निवडणुकांमध्ये आम्ही अनेकदा आढळराव पाटील यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला परंतू आढळराव पाटील यांचा शेवटच्या मतदारासोबत असलेला कनेक्ट, सामाजिक काम, डाऊन टू अर्थ राहण्याची त्यांची पद्धत यामुळे ते आम्हाला शक्य होत नव्हते. दरम्यान, 2019 ची निवडणूक लागली अनेकांचा आम्ही शिरुर लोकसभेसाठी विचार करत होतो पण कोणीच तयार होईना. मग आम्ही मागील वेळी धनंजय मुंडे यांच्या घरी बसलो असताना आम्ही डाँ. आमोल कोल्हे यांना फोन करुन बोलावून घेतले. आम्ही त्यांना म्हटले तुम्ही शिरुर लोकसभेतूान निवडणूक लढवा. ते म्हणाले मी शिवसेनेत आहे. लोकसभेचा मला काहीच अनुभव नाही, परंतू मी त्यांना सगळं आम्ही पाहतो म्हटलो, आणि आम्ही त्यांना उभे केले. महिला व तरुण वर्गांने त्यांना छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केल्यामुळे डोक्यावर घेतले. याच कारणास्तव ते निवडून आले. परत एक, दोन वर्षांत हा माणूस माझ्याकडे येऊन म्हणतो राजीनामा द्यायचा आहे. मला माझ्या अभिनय क्षेत्राला वेळ देता येत नाही म्हणाले. मी समजावून सांगितले आणि राजीनामा देण्यापासून थांबवले. या व्यक्तीने कुठलेही विकासाचे प्रश्न मार्गी लावले नाही. मतदारसंघात पिरकलेही नाहीत. आता मात्र या मतदार संघातील पाणी, ट्र्रँफिक, कारखाना सुरु करणे हे सर्व प्रश्न आम्ही आदरणीय नरेंद्र मोदीजी, अमित शहा साहेब, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब सगळे मिळून हे प्रश्न सोडवू. विकासाचे सर्व प्रश्न तडीस नेऊ. उरुळी कांचन व मतदार संघातील सर्व प्रश्न सोडवू त्यासाठी आपण सर्वांनी येत्या 13 तारखेला आढळराव पाटील यांच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा.”
उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले,”ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची आहे. या निवडणूकीत आपण आपल्या देशाचे पंतप्रधान ठरवणार आहोत. येथे खरी लढत आदरणीय विकासपुरुष नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यात आहेत.परंतू कुठल्याही व्यक्तीला विचारले तर पंतप्रधान पदासाठी मोदीजीच हवेत असे नागरिक सांगतात. राम मंदिरासारखा आपल्या अस्मितेचा प्रश्न फक्त आदरणीय मोदीजीच सोडवू शकले. 370 सारखे कलम फक्त मोदीजी यांनीच काश्मीरमधून हटविले. मागील 10 वर्षांत अनेक विकासकामे देशात झाली आहेत. आदरणीय अजित दादा यांच्या मार्फत अनेक गावांना निधी मिळवून दिला आहे. खासदार नसतानाही मी 450 गावांत निधी आणला आहे. 700 गावे मी पायाला भिंगरी लावून फिरलो आहे. माझ्या लोकांच्या समस्या मी सोडविल्या आहेत. मी पराभूत होऊनही मी पायाला भिंगरी लावून फिरलो,मोठा निधी मतदार संघात आणला आहे. मी 20 वर्षांत अनेक प्रकल्प मतदार संघात आणून मतदारसंघाचा कायापालट केला आहे. मोदीजी यांच्या विचाराचा पुर्णवेळ खासदार आपल्याला विजयी करायचा आहे. कोरोना काळात मी जीवाची पर्वा न करता माझ्या मतदार संघातील नागरिकांना आधार देण्याचे काम केले. 2014-15 च्या दरम्यान आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू आणि तुळापूर येथे करण्याचा 140 कोटींचा विकास आराखडा सादर केला. आमचा पराभव झाला परंतू तरीही आम्ही प्रयत्न सुरुच ठेवले. 400 कोटींचा विकास आराखडा मंजूर करुन घेतला. आता त्याचे कामही सुरु झाले आहे. माझे व तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर आपल्याला सत्तेमधील खासदार निवडून द्यावा लागेल. समोरचा विद्यमान खासदार याने पाच वर्षांत कुठलेही काम केले नाही. हक्काचा निधी या निष्क्रिय खासदारामुळे परत गेला आहे. सध्या माझ्यावर खोटारडे आरोप केले जात आहेत. हे षडयंत्र एखादा बहुरुपीच करु शकतो. पण यावेळी जनता यांना भुलणार नाही. लोकं मला आत्मियतेने सांगतात गेल्या वेळी आमची चूक झाली आता ती आम्ही दुरुस्त करु. येणाऱ्या 13 तारखेला आपण जागृत राहून मला घड्याळाला जास्तीत-जास्त मतदान करावे हीच विनंती करतो. यावेळी प्रदीप कंद, मंगलदास बांदल, अक्षय आढळराव पाटील आदींनी आपली भूमिका मांडली. महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. परिसरतील नागरिक व महायुतीच्या समर्थकांनी सभेला मोठी गर्दी केली.