ताज्या घडामोडीपिंपरी
डॉक्टर अर्चना निवृत्ती गांगड यांना पीएचडी प्रदान
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. अर्चना गांगड यांनी गणित या विषयातून ब्रेनट्युमर इमेज सेंग- मेंटेन्शन बाय परसिस्टंट होमोलॉजी टूल फ्रॉम टोपोलॉजीकल डेटा अनालिसिस या विषयावर संशोधन करून प्रबंधाचे सादरीकरण राजस्थान येथील श्री जगदीश प्रसाद झांबरमल टिबरेवाला विद्यापीठात केले. विशेष अनमोल मार्गदर्शन डॉ. प्रभा रस्तोगी, डॉ. मिलन जोशी, डॉ. विश्वजीत गोस्वामी यांनी केले.
प्रतिभा शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सत्कार केला व भावी कार्यास डॉ अर्चना गांगड शुभेच्छा दिल्या.