ताज्या घडामोडीपिंपरी

जर तीन दिवसांनी शहराला पाणीपुरवठा झाला तर.. भविष्याचा वेध घेणारे पथनाट्य!

Spread the love

 

पिंपळे गुरव ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपळे गुरव या परिसरात सामाजिक काम करणाऱ्या दिलासा संस्था, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, मानवी हक्क संरक्षण जागृती, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने कडक उन्हाळ्यात पाणी बचतीचा संदेश देणारे पथनाट्य राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव येथे सादर करण्यात आले.

या पथनाट्यात मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील, दिलासा संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, गुणवंत कामगार संगीता जोगदंड, शब्दधन काव्यमंचाचे सदस्य नंदकुमार कांबळे शामराव सरकाळे तसेच दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सहभाग घेतला.

*वासुदेव आला हो वासुदेव आला..*
*पाणी बचत सारे मिळून करू या चला..*
असे म्हणत वासुदेवाच्या भूमिकेत अण्णा जोगदंड यांनी पथनाट्याची सुरुवात केली.

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते ईश्वर आहेत असे वासुदेव सांगत होता.
पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मर्यादित पाणी साठ्याची धरणे शहरासाठी उपलब्ध आहेत. याचा भविष्यात ताळमेळ घातला गेला नाही तर येत्या काही वर्षात शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल आणि मग भविष्यात तीन दिवसांनी पाणीपुरवठा शहरातील नागरिकांना स्वीकारावा लागेल.
याचा दूरदृष्टीने विचार करून शहरातील प्रत्येक माणसाने पाणी जपून वापरले पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वड, पिंपळ अशा वृक्षांची लागवड केली पाहिजे.
असा माहितीपूर्ण संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तसेच पाणीपुरवठा विभाग यांना संस्थांच्या वतीने पत्र देण्यात आले.
या पथनाट्य कार्यक्रमाला ह. भ. प. बंडोपंत शेळके, अनिल जाधव, वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तानाजी एकोंडे, शिवाजीराव शिर्के, संजय चव्हाण, लक्ष्मण शिंदे, इश्वरलाल चौधरी, फुलवती जगताप, आत्माराम हारे, सोमनाथ कोरे, अरुण परदेशी, जाई जोगदंड, बबन मगर, विकास कोरे, काळूराम लांडगे, बळीराम शेवते, भरत शिंदे, शंकर नाणेकर, प्रकाश वीर, गणेश वाडेकर, रवींद्र तळपाडे, गणपत शिर्के, विनोद सुर्वे,दत्तात्रय घोंगडे,ऋतिक मगर, श्रीराम डुकरे, दत्तात्रय डोंगरे, इंद्रजीत चव्हाण, लक्ष्मण जोगदंड, निलेश इंचाटे उपस्थित होते.

कैलास भैरट आणि योगिता कोठेकर यांनी पाणी बचतीच्या कविता सादर केल्या.
हेमंत जोशी यांनी आभार मानले. राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
वृत्तांकन – आण्णा जोगदंड
९८८१२०९११९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button