पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे अहिंसा पुरस्कार जाहीर -डॉ अरुण आंधळे, प्रा चंद्रकांत वानखेडे, ह भ प रोहीणी परांजपे, रफीक शेख, आणि राजेंद्र केरकर पुरस्काराचे मानकरी
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अजैन आणि पुर्ण शाकाहारी व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाणार आहे ,हा पुरस्कार भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या दिवशी दिला जातो. या वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,औंध चे प्राचार्य डॉ अरुण आंधळे यांना शैक्षणिक क्षेत्रातील, कविराज प्रा चंद्रकांत वानखेडे यांना साहित्यिक क्षेत्रातील, ह भ प रोहीणी परांजपे यांना समाजप्रबोधन क्षेत्रातील, श्री रफीक शेख यांना समाजसेवा क्षेत्रातील,आणि श्री राजेन्द्र केरकर यांना पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल अहिंसा पुरस्कार जाहीर झाला आहे, संस्थेचे पदाधिकारी आणि प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते दि २१ एप्रिल रोजी सायं ७ वा प्रा रामकृष्ण मोरे सभागृहात दिला जाणार आहे , अशी माहिती पुरस्कार समिती प्रमुख, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया आणि अध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली.