भारताचे माजी राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा , पिंपरी येथे 15 वा पदवीप्रदान समारंभ आज होणार


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) डॉ. डी. वाय पाटील (अभिमत) विद्यापीठ, पिंपरी, पुणे येथे 15 वा पदवीप्रदान समारंभ या कार्यक्रमाला भारताचे माजी राष्ट्र्पती मा. रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात शनिवार, दि. 13 एप्रिल 2024 रोजी, सकाळी 11:00 वाजता हा समारंभ होणार आहे.
या कार्यक्रमात सोमनाथ एस. अध्यक्ष – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), बेंगळुरू यांना त्यांच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आणि सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष तसेच सिम्बायोसिस इंटरनॅशनल अभिमत विद्यापीठाचे कुलपती – प्रा. डॉ. एस.बी. मुजुमदार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ठ योगदानाबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स या पदवी प्रदान करण्यात येणार आहेत.
या समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 21 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात येईल. विविध विद्याशाखेतील 5326 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येत असून यामध्ये 30 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 4433 पदव्युत्तर पदवी, 853 पदवी व 10 पदविका या अशा एकूण 8 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल.



डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी, पुणे चे कुलपती मा. डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती मा. डॉ. भाग्यश्री पी. पाटील, कुलगुरू मा. डॉ. एन. जे. पवार, प्र- कुलगुरू मा. डॉ. स्मिता जाधव, सचिव मा.डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व खजिनदार मा. डॉ. यशराज पाटील यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच डॉ डी.वाय. विद्यापीठ, पिंपरी, पुणे च्या फेसबुक पेजवर आपण पाहू शकता अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी दिली आहे.
https://www.facebook.com/dpu.in








