ताज्या घडामोडीपिंपरी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य अर्पण करून वैचारिक अभिवादन करण्याचे आवाहन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात अधिक शिक्षणाला महत्व दिले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका-संघटित व्हा व संघर्ष करा असा मुलमंत्र दिला. बाबासाहेबांच्या शैक्षणिक विचारांचा आदर्श घेत रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार फुले अर्पण करण्यापेक्षा वही, पेन व शैक्षणिक साहित्य अर्पण करून वैचारिक अभिवादन करावे असे आवाहन करण्यात येते.

हे अभियान दरवर्षी राबवले जाते. यावर्षी देखील संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भिमसृष्टी स्मारक, पिंपरी येथे दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजलेपासून हे अभियान दिवसभर राबवण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व आंबेडकरी अनुयायांना आवाहन करण्यात येते की, आपण जयंतीदिनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येताना हार फुले न आणता वही, पेन, शैक्षणिक साहित्य अर्पण करून वैचारिक अभिवादन करावे. या अभियाना अंतर्गत जमा झालेले शैक्षणिक साहित्य महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत दिले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button