ताज्या घडामोडी

श्रीरंग बारणे यांनी प्रकाशन केलेल्या पुस्तकात स्वर्गवासी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा उल्लेख नसल्ल्याने त्यांच्या परिवाराचा श्रीरंग बारणे यांना पडला विसर – ललित म्हसेकर

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेले एक दोन दिवसापूर्वी श्रीरंग बारणे यांनी “संसदरत्न श्रीरंग आप्पा” या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे, प्रकाशन केलेल्या पुस्तकांमध्ये विविध क्षेत्रातील विविध भागातील अनेक मंडळींचे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणणे मांडले आहेत, परंतु खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये आदरणीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व त्यांच्या परिवारातील कोणत्याही सदस्यांचा उल्लेख केलेला नाही यावरून असे लक्षात येते की खासदार आप्पा बारणे यांना पिंपरी चिंचवडचे विकासाचे शिल्पकार आदरणीय स्वर्गवासी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व त्यांच्या परिवाराचा विसर पडलेला आहे.

मागील पंचवार्षिक मध्ये आदरणीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे काय योगदान आहे याची भुरळ बारणे यांना पडली आहे, स्वर्गवासी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या सांगण्यावरून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी परिचित नसलेले श्रीरंग आप्पा बारणे म्हणजेच युतीचे काम केले त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु बारणे ना स्वर्गवासी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा विसर पडला आहे , हि गोष्ट सर्व भाऊ प्रेमी, परिसरातील कार्यकर्त्यांना व नागरीकांना जिव्हारी लागली आहे, तसेच एक भाऊ समर्थक म्हणून मी व माझे सर्व सहकारी आम्ही भाऊंचा व जगताप परिवाराचा विसर पडलेल्या श्रीरंग आप्पा बारणे यांना मतदान करणार नाही, असे भाजपा उपाध्यक्ष सांगवी रहाटणी मंडल ललित म्हसेकर म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button