तृतीय पंथीयाना मिळणार मोफत ड्रायविंग प्रशिक्षण व लायसन्स
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याच्या चिटणीस आणि वाल्हेकर वाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी मारकड यांच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त महिला भगिनींसाठी फोर व्हीलर ड्रायविंग प्रशिक्षण उपक्रमास सुरुवात करण्यात आली.
शंकर जगताप शहराध्यक्ष भाजपा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना महीला सबलीकरण साठी पल्लवी चंद्रकांत मारकड यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याच्या चिटणीस आणि वाल्हेकर वाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौं. पल्लवी मारकड यांच्या वतीने महिला दिनानिमित्त महिला भगिनींसाठी सवलतीच्या दरात ड्रायव्हिंग लायसन व वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची सुविधा कालपासून परिसरात करण्यात आली.
सदरचे प्रशिक्षण नाव नोंदणी केलेल्या महिला भगिनींनाच उपलब्ध असणार असून चिंतामणी गणेश मंदिराजवळ हे प्रशिक्षण होणार आहे. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी भाजपा महिला मोर्चा पिंपरी चिंचवड च्या अध्यक्षा सुजाता पालांडे, करुणा चिंचवडे,भारतीय स्त्री शक्तीच्या प्रमुख निवेदिता कछवा ,प्रदेश महाराष्ट्र पश्चिम सचिव सौं कविताताई हिंगे, सुरभी ड्रायव्हिंग क्लासेसच्या संचालिका नीता कुशारे ,महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष दिपाली कलापुरे,महिला मोर्चा सरचिटणीस अनघा रुद्र, महिला मोर्चा चिटणीस पल्लवी पाठक, विद्या चिंचवडे, आदी मान्यवर उपस्थित होत्या
यावेळी सुजाता पालांडे यांनी मनोगत व्यक्त करताना सदरच्या प्रशिक्षणात नोंदणी कृत तृतीयपंथी बांधवाना आपण हे प्रशिक्षण मोफत देणार असून त्याचा परिसरातील तृतीय पंथी यांनी लाभ घ्यावा.मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सुविधा पोहोचण्यासाठी भाजपा आणि आम्ही कटिबद्ध आहोत.
करुणा चिंचवडे म्हणाल्या की, महिलांना सक्षम करण्यासाठी खूप छान उपक्रम राबवला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होणार आहे.या उपक्रमात 40 महिलांना फोरविलर ड्रायविंग प्रशिक्षण देणार असून लर्निंग लायसन फ्री मिळणार आहे. हा उपक्रम प्रशिक्षण 16 दिवसाचे असणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका पल्लवी मारकड यांनी केले व आभार विद्या चिंचवडे यांनी मानले.