ताज्या घडामोडीपिंपरी

महिलांच्या उन्नतीसाठी जागतिक महिला दिनानिमित्त फोर व्हीलर ड्रायव्हिंग क्लासेसचा शुभारंभ

Spread the love

 

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -महिला सबलीकरण व उन्नती साठी भाजपा महिला मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने विविध उपक्रम शहराध्यक्ष शंकर जगताप व महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जातात.

पिंपरी चिंचवड शहरात नोकरदार महिला,विद्यार्थिनी यांचे मोठे प्रमाण आहे.फोर व्हीलर ड्रायव्हिंग हे आत्मविश्वास वाढवणारे कौशल्य आहे, फोर व्हीलर ड्रायव्हिंग मध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे, महिलांनी फोर व्हीलर ड्रायव्हिंग शिकावे यासाठी भाजप महिला मोर्चा सचिव पल्लवी पाठक,महीला मोर्चा उपाध्यक्ष दीपाली कलापुरे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून सुरभी मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका व भाजप महिला उद्योग आघाडी राज्य उपाध्यक्ष  निता कुशारे यांच्या सहकार्याने माफक दरात फोर व्हीलर ड्रायव्हिंग क्लासेस सुरू केले आहेत.

या क्लासेसचा शुभारंभ कार्यक्रम माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमासाठी सोना गडदे सरचिटणीस ओबीसी तसेच महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये शहरातील बहुतांश महिलांनी यामध्ये नोंदणी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button